Sharad Pawar And Ajit Pawar saam tv
मुंबई/पुणे

Politics: ठरलं तर मग! पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार, २५-२६ डिसेंबरला करणार घोषणा

Sharad Pawar And Ajit Pawar Group: पुण्यामध्ये मोठी राजकीय घडामोड घडत आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू आहे. दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकांवर बैठका सुरू आहेत. येत्या २५-२६ डिसेंबरला अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Priya More

Summary:

  • पुणे महापालिका निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार

  • २५-२६ डिसेंबरला युतीची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता

  • पुण्यात दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या गुप्त बैठका

  • जागावाटपावर चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे

आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. यासाठी दोन्ही पक्षांकडून हालचालींना वेग आला असून महत्वाच्या नेत्यांच्या पुण्यात बैठका सुरू आहेत. अशातच मोठी बातमी समोर आली आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत निर्णय झाला असून येत्या २५ किंवा २६ डिसेंबरला याची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. नगरपालिका निवडणुकीत काही ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या होत्या. त्यानंतर आता महापालिका निवडणुकीत देखील दोन्ही राष्ट्रवादीने एकत्रित येण्यासाठी तयारी सुरू केली आहे.

अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुभाष जगताप यांनी दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार असून लवकरच याची घोषणा केली जाईल असे सांगितले. ते म्हणाले की, 'पुण्यामध्ये रात्री दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक झाली. दोन्ही पक्षांनी एकत्र लढण्याबाबत ठरवलं आहे. जागा वाटपासाठी दोन- दोन पावलं आम्ही मागे घेणार होतो. प्रशांत जगताप कालच्या बैठकीला नव्हते. विशाल तांबे, वंदना चव्हाण यांच्यासोबत बैठक होणार आहे. २५ किंवा २६ तारखेला दोन्ही राष्ट्रवादीची युती जाहीर होईल.'

दोन्ही राष्ट्रवादीच्या पुणे शहरातील नेत्यांची गुप्त बैठक सुरू आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्रीकरणाला पुण्यात जोरदार हालचाली सुरू आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून अंकुश काकडे, विशाल तांबे तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून सुभाष जगताप आणि सुनील टिंगरे बैठकीला उपस्थित आहेत. पुणे महापालिका निवडणुकीच्या जागांवर चर्चा तसेच इतर मुद्दे बैठकीत मांडले जाणार आहेत. दोन्ही पक्षातील स्थानिक नेत्यांकडून बैठकीनंतर वरिष्ठ नेत्यांना माहिती पाठवली जाणार आहे.

दरम्यान, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी विरोध केला आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत आघाडी करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर मी राजीनामा देईल असे त्यांनी सांगितले होते. आता नाराज असलेले प्रशांत जगताप हे राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. ते सुप्रिया सुळे यांची भेट घेण्यासाठी मुंबईला रवाना झाले आहेत. दोन्ही राष्ट्रवादीमध्ये एकत्रित येण्यासाठी चाललेल्या चर्चांमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur : पाठलाग केला, प्रवाशांना चाकूचा धाक; कोल्हापूर-मुंबई खासगी बस हायजॅक, सोनं-चांदीसह १.२२ कोटींचा मुद्देमाल लुटला!

तरुणाने बाथरुममध्ये ठेवले शारीरिक संबंध; अचानक गर्लफ्रेंडला प्रचंड रक्तस्त्राव, पुढील काही क्षणात मृत्यू

Maharashtra Live News Update : वर्ध्यात सामान्य रुग्णालयात आग!

Milk Food Combinations: दुधासोबत कोणते पदार्थ खाल्याने Acidityची समस्या वाढते?

Cancer: महिलांच्या शरीरात हे बदल दिसले तर समजा कॅन्सर झालाय

SCROLL FOR NEXT