पुण्यात पुन्हा भाजपचा डंका
पुण्यात भाजपकडून दोन्ही राष्ट्रवादीला धक्का
पुण्यातील भाजपच्या विजयी उमेदवारांची यादी
पुण्यात पुन्हा एकदा भाजपने महापालिकेवर विजयाचा झेंडा फडकावला आहे. भाजपने दोन्ही पवारांच्या राष्ट्रवादीला धूळ चारली आहे. भाजपने पुण्यात एकहाती सत्ता मिळवली आहे. या विजयाने पुण्यात भाजपच 'बाजीराव' असल्याचे स्पष्ट झाले आहे. पुणे महापालिकेवर जिंकलेल्या उमेदवारांची यादी हाती आली आहे.
पुणे महापालिकेवर भाजपची सत्ता कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. मध्यवर्ती भागातील बहुतांश सर्वच भागात भाजपचा झेंडा पाहायला मिळत आहे. पुणे महापालिकेच्या निवडणुकीत आत्तापर्यंत भाजपकडून ७ पॅनल विजयी झाले आहे.
पुण्यात भाजपने सर्वत्र आघाडी घेतल्याने शहरात जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळतंय. निकाल जाहीर होताच भाजपच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडत, ढोल-ताशांच्या गजरात आणि घोषणा देत आनंद साजरा केलाय. शहरातील विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्साही गर्दी रस्त्यावर उतरली आहे.
भाजपच्या विजयी उमेदवारांची यादी
रूपाली पवार (प्रभाग १०)
दिलीप वेडेपाटील (प्रभाग १०)
किरण दगडे (प्रभाग १०)
अल्पना वरपे (प्रभाग १०)
महेश वाबळे (प्रभाग ३६)
सई थोपटे (प्रभाग ३६)
शैलजा भोसले (प्रभाग ३६)
वीणा घोष (प्रभाग ३६)
तन्वी दिवेकर (प्रभाग २०)
मानसी देशपांडे (प्रभाग २०)
राजेंद्र शिळीमकर (प्रभाग २०)
परशुराम वाडेकर (प्रभाग ८)
अजित गायकवाड (प्रभाग ८)
सपना छाजेड (प्रभाग ८)
सनी उर्फ चंद्रशेखर निम्हण (प्रभाग ८)
अर्चना जगताप (प्रभाग ४०)
रंजना टिळेकर (प्रभाग ४०)
पूजा कदम (प्रभाग ४०)
वृषाली कामठे (प्रभाग ४०)
डॉ. श्रेयस खांदवे (प्रभाग ३)
अनिल सातव (प्रभाग ३)
ऐश्वर्या पठारे (प्रभाग ३)
रामदास दाभाडे (प्रभाग ३)
राघवेंद्र मानकर (प्रभाग २५)
स्वरदा बापट (प्रभाग २५)
कुणाल टिळक (प्रभाग २५)
स्वप्नाली पंडीत (प्रभाग २५)
वर्षा साठे (प्रभाग ३९)
रुपाली धाडवे (प्रभाग ३९)
बाळा ओसवाल (प्रभाग ३९)
प्रसन्न वैरागे (प्रभाग २१)
सिद्धी शिळीमकर (प्रभाग २१)
मनिषा चोरबोले (प्रभाग २१)
श्रीनाथ भिमाले (प्रभाग २१)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.