Pune Municipal Corporation recruitment Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Municipal Corporation recruitment : पुणे महानगरपालिकेत नोकरीची संधी; ६८२ पदांसाठी होणार भरती, लगेचच करा अर्ज

Pune Municipal Corporation recruiting for 682 vacancies : पुणे महानगरपालिकेत नोकरीची संधी आहे. ६८२ पदांसाठी भरती होणार असल्याची माहिती मिळतेय.

Rohini Gudaghe

अक्षय बडवे, साम टीव्ही पुणे

जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल, तर ही मोठी बातमी खास तुमच्यासाठी आहे. पुणे महानगरपालिकेत नोकरीची मोठी संधी आहे. नुकतंच या भरती प्रक्रियेची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आलीये. इच्छुक उमेदवारांनी अजिबातच वेळ वाया न घालवता अर्ज करणं, शहाणपणाचं ठरणार आहे. कारण अर्ज करण्याचा कालावधी अत्यंत कमी आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यां लोकांसाठी खरोखरच ही एक मोठी संधी आहे.

पुणे महानगरपालिकेत नोकरीची संधी

पुणे महानगरपालिकेत पुन्हा पदभरती होणार (Pune Municipal Corporation recruitment) आहे. पुणे महानगरपालिकेत एकूण ६८२ रिक्त पदांसाठी भरती होणार आहे. महापालिकेकडून ६८२ पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालीय. इच्छुक उमेदवारांकडून पुणे महानगरपालिकेने ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले आहेत. अर्ज करण्याची मुदत अत्यल्प आहे. १९ ऑगस्टपर्यंत इच्छुकांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

कोणत्या पदांसाठी भरती ?

पुणे महानगरपालिकेत पुढील पदांसाठी भरती सुरू आहे. कनिष्ठ अभियंता, फोलमन, मेकॅनिक, ऑटो इलेक्ट्रिफिकेशन,वेल्डिंग, पेटिंग, या जागा भरण्यात येणार आहेत. पुण्यात नोकरी शोधणाऱ्यांसाठी नोकरीची चांगली संधी उपलब्ध (Pune Municipal Corporation) झालीय. पुणे महानगरपालिकेअंतर्गत ही भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. नुकतंच पालिकेनं याबाबत अधिसूचना जाहीर केलीय.

६८२ पदांसाठी होणार भरती

या पदांसाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत (Pune News) आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून १९ ऑगस्ट २०२४ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. खरं तर जे उमेदवार सरकारी नोकरीच्या शोधात आहेत, त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधीच आहे. त्यामुळे वेळ न दवडता तातडीने अर्ज करणं, फायदेशीर ठरणार (Latest job update) आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही महानगर पालिकेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देवू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results :नंदुरबार जिल्ह्यातील चार विधानसभेच्या मतमोजणीला काही वेळात सुरुवात....

Bachchu Kadu : विधानसभा निकालाआधी बच्चू कडूंना मोठा दिलासा, कोर्टाकडून निर्दोष सुटका, नेमकं प्रकरण काय?

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT