दोन्ही पक्षांनी घड्याळ आणि तुतारी या चिन्हांवर निवडणूक लढवण्याचे मान्य केलंय.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जागावाटप निश्चित
अजित पवार गटाला ११० तर शरद पवार गटाला ५० जागा मिळाल्या आहेत.
गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या गुप्त बैठका आणि गाठीभेटींनंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं ठरलंय. आता पिंपरी-चिंचवड पाठोपाठ पुण्यातही काका-पुतणे एकत्र आले आहेत. चिन्हांबाबत चालू असलेल्या वादावर आज मार्ग तोडगा यशस्वी तोडगा काढण्यात आलाय. आज अखेरच्या बैठकीत चिन्ह आणि जागावाटप बाबत निर्णय घेण्यात आलाय. दोन्ही पक्षांमध्ये जागा वाटप कशापद्धतीने करण्यात आलंय, याचा फॉर्म्युला समोर आलाय.
पुण्यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला ११०, तर शरद पवार गटाला ५० आणि ५ जागा इतर पक्षांना देण्यात आल्या आहेत. तर दोन्ही राष्ट्रवादी पक्ष आपआपल्या चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत. घड्याळ आणि तुतारी या दोन्ही चिन्हावर पुणे महापालिका निवडणूक लढवली जाणार आहे.याबाबतची माहिती अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाचे राज्य प्रवक्ते विकास पासलकर यांनी दिली.
पिंपरी-चिंचवडमधील सर्व प्रश्न एकत्रितपणे सोडवण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येत आहेत, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी केली होती. तळवडे येथून प्रचाराचा नारळ फोडताना त्यांनी आगामी निवडणुकीत शहरात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार असल्याचं स्पष्ट केलं. पिंपरी-चिंचवडनंतर आता पुण्यातही दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढणार आहेत. काल रात्री उशिरापर्यंत झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर यावर एकमत झाले आहे. दोन्ही पक्षाकडून जागावाटप करण्यात आलंय. मात्र या जागा वाटपमध्ये शरद पवार गटानं काहीशी माघार घेतल्याचं दिसत आहे.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, दोन्ही चिन्हावर लढणार आहेत. ज्याठिकाणी ज्या पक्षाचे उमेदवार जास्त तिथे ते चिन्ह वापरलं जाणार आहे. उदाहरण १: एका प्रभागात अजित पवार गटाचे ३ उमेदवार आहेत आणि १ उमेदवार शरद पवार गटाचा असेल तर तेथे ४ ही जणं घड्याळ चिन्हावर लढतील. तर ज्याठिकाणी २ उमेदवार दोन्ही पक्षाचे आहेत तिथे दोन्ही चिन्हे वापरले जातील.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.