Pune latest News : Saam tv
मुंबई/पुणे

Pune News : पुण्यात बुलडोझर पॅटर्न! महापालिकेने २४ अनधिकृत इमारती पाडल्या

Pune latest News : पुणे महापालिकेने हवाई दलाच्या प्रतिबंधित क्षेत्रातील २४ इमारतींवर कारवाई केली. पालिकेने या अनधिकृत बांधकामावर बुलडोझर चढवला.

Vishal Gangurde

सचिन जाधव, साम टीव्ही

Pune News : पुणे महापालिकेने हवाई दलाच्या प्रतिबंधित क्षेत्रातील २४ इमारतीवर कारवाई केली आहे. लोहगाव नवीन हद्दीमध्ये हवाई दलाने प्रतिबंधित केलेल्या ९०० मीटरच्या बॉम्बेडंप भागातील बांधकामावर महापालिकेने बुलडोझर चढवला. या भागातील २४ इमारती पाडून टाकून सुमारे ४८ हजार चौरस मीटरवरील अनधिकृत बांधकाम पाडून टाकले आहेत.

लोहगाव विमानतळ हवाई दलासाठी सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. या विमानतळाच्या परिसरात बांधकामे होऊ नयेत. यासाठी केंद्र शासनाची नियमावली आहे. जी बांधकामे झाली आहेत, ती पाडून टाकण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून महापालिकेने सर्वेक्षण सुरु केले आहे. त्यामुळे हा मुद्दा ज्वलंत असताना त्यातच महापालिकेने बफर झोन भागात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामावर जोरदार कारवाई केली.

बांधकाम विभागाने २४ जणांना नोटीस बजावली होती. त्यावर मंगळवारी कारवाई करत सुमारे ४८ हजार चौरस फुटाचे बांधकाम पाडून टाकण्यात आले. यामध्ये जेसीबी, जॉ कटर या मशिनचा वापर करण्यात आला आहे. या कारवाईमुळे नव्याने बांधकाम केलेल्या नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange : भुजबळ नाराज म्हणजे मराठा आरक्षणाचा जीआर पक्का - मनोज जरांगे पाटील

Symptoms of hypertension: ब्लड प्रेशर वाढलं की शरीरात होतात 'हे' बदल; उशीर होण्यापूर्वी धोके जाणून घ्या

America: जगाला टॅरिफचा धसका दाखवणारे ट्रम्पच अडचणीत, अमेरिका महामंदीच्या उंबरठ्यावर, Moody's चा दावा

Shilpa Shetty : शिल्पा शेट्टीचं 'बॅस्टियन' रेस्टॉरंट बंद होणार, भावुक पोस्ट शेअर

Chhagan Bhujabal: मंत्रिमंडळाच्या बैठकीला छगन भुजबळ गैरहजर, मराठा आरक्षण जीआरवरून नाराज

SCROLL FOR NEXT