PMC INTRODUCES QR CODE VERIFICATION ON APPOINTMENT LETTERS AFTER FAKE RECRUITMENT SCAM Saam Tv
मुंबई/पुणे

PMC Recruitment : पुणे महापालिकेचा मोठा निर्णय! नियुक्तीपत्रांवर असणार QR कोड, बनावट भरतीला बसणार आळा

Pune Municipal Corporation Recruitment : पुणे महापालिका प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. ५ जूनपासून सर्व नियुक्तीपत्रांवर QR कोड देण्यात येणार असून स्कॅन केल्यानंतर उमेदवारांना अधिकृत माहिती ऑनलाइन पाहता येणार आहे.

Alisha Khedekar

  • पुणे महापालिकेच्या नियुक्तीपत्रांवर आता QR कोड असणार

  • QR कोड स्कॅन करून उमेदवारांना अधिकृत माहिती तपासता येणार

  • बनावट भरती आणि फसवणूक रोखण्यासाठी डिजिटल प्रणाली लागू

  • नवी प्रणाली ५ जूनपासून लागू करण्यात येणार आहे

सागर आव्हाड, पुणे

पुणे महापालिकेत नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवत बेरोजगार तरुणांची फसवणूक केल्याच्या घटना समोर आल्यानंतर प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. आता महापालिकेकडून देण्यात येणाऱ्या कायमस्वरूपी तसेच कंत्राटी नियुक्तीपत्रांवर क्यूआर (QR) कोड देण्यात येणार आहे. हा कोड स्कॅन केल्यानंतर संबंधित उमेदवाराला त्याच्या नियुक्तीबाबतची अधिकृत माहिती थेट महापालिकेच्या संकेतस्थळावर पाहता येणार आहे. यामुळे बनावट नियुक्तीपत्रांच्या माध्यमातून होणाऱ्या फसवणुकीला मोठा आळा बसणार असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. ही नवी प्रणाली ५ जूनपासून लागू करण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त महापालिका आयुक्त प्रजीत नायर यांनी दिली.

काही दिवसांपूर्वी पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) नावाने बनावट नियुक्तीपत्रे तयार करून अनेक तरुणांची आर्थिक फसवणूक झाल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. विशेष म्हणजे, AIचा वापर करून महापालिकेचा लोगो, अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आणि अधिकृत आदेशांची हुबेहूब नक्कल करण्यात येत होती. त्यामुळे सामान्य नागरिकांना खरे आणि बनावट आदेश यामधील फरक ओळखणे कठीण जात होते.

महापालिकेतील (PMC) चतुर्थ श्रेणीतील कंत्राटी नोकऱ्यांच्या नावाखाली लाखो रुपयांची उलाढाल होत असल्याचेही तपासात समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने डिजिटल पडताळणीची ही नवी यंत्रणा आणण्याचा निर्णय घेतला. प्रत्येक नियुक्तीपत्रावर स्वतंत्र QR कोड असणार असून, तो स्कॅन केल्यानंतर संबंधित उमेदवाराची माहिती, पद, नियुक्ती आदेश आणि त्याची अधिकृत नोंद ऑनलाइन उपलब्ध होणार आहे.

याशिवाय, भरती प्रक्रियेतील प्रत्येक टप्पा डिजिटल पद्धतीने ट्रॅक करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था उभारण्यात येणार आहे. त्यामुळे भरती प्रक्रियेत पारदर्शकता वाढण्यास मदत होईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे. दरम्यान, पुणे महापालिकेत २०१४ पासून नियमित चतुर्थ श्रेणी भरती बंद असून केवळ लाड-पागे आयोग आणि अनुकंपा तत्त्वावरील भरती केली जात आहे. तरीदेखील बोगस भरती रॅकेट सक्रिय असल्याचे समोर आल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. या रॅकेटमध्ये महापालिकेतील कोणत्या कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे का? याची चौकशी केली जाणार असून संशयितांची माहिती पोलिसांकडे दिली जाईल, असेही प्रजीत नायर यांनी स्पष्ट केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Terror Attack : दहशतवादी हल्ल्याने पाकिस्तान हादरला, पोलीस ठाण्यात तैनात जवानांवर गोळीबार, ९ जणांचा मृत्यू

बाजारातली नकली आणि खरी बटाटी कशी ओळखायची? खरेदी करण्यापूर्वी 5 ट्रिक्स ठेवा लक्षात

तुकाराम मुंढेंना राज्यातील पहिला मोठा झटका; गोरस भंडार प्रकरणात उच्च न्यायालयाचा FDA ला दणका

Maharashtra News Live Update: नांदूर मधमेश्वर धरणातून पाण्याचा विसर्ग पुन्हा वाढवला

Maharashtra Rain: राज्यात पुढील ५ दिवस मुसळधार पावसाचा इशारा; उद्याही शाळांना सुट्टी मिळणार का?

SCROLL FOR NEXT