Pune : पुण्यातील वाहतुकीत मोठा बदल, कोणते रस्ते बंद? पर्यायी मार्ग कोणते? वाचा सविस्तर

Pune Traffic Diversions Announced : बकरी ईद निमित्त पुण्यात वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. अनेक मार्गांवर वाहतूक बंद ठेवण्यात येणार असून वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
PUNE TRAFFIC DIVERSION ANNOUNCED FOR BAKRI EID PRAYERS AT GOLIBAR MAIDAN
PUNE TRAFFIC DIVERSION ANNOUNCED FOR BAKRI EID PRAYERS AT GOLIBAR MAIDANSaam Tv
Published On
Summary
  • बकरी ईद निमित्त पुण्यात वाहतुकीत मोठा बदल

  • सकाळी ६ वाजल्यापासून काही प्रमुख मार्गांवर वाहतूक बंद

  • जड वाहनांना काही मार्गांवर प्रवेशबंदी लागू करण्यात आली.

  • नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले.

सचिन जाधव, पुणे

पुण्यातून मोठी बातमी समोर आली आहे. शहरातील वाहतुकीत मोठा बदल करण्यात आला आहे. पुणे शहरात बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. त्यानिमित्त मुस्लीम बांधव विविध मशिदी, ईदगाह मैदान आणि सार्वजनिक ठिकाणी सामूहिक नमाज पठणासाठी मोठ्या संख्येने एकत्र येणार आहेत. विशेषतः गोळीबार मैदान ईदगाह परिसरात मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता पुणे वाहतूक पोलिसांनी वाहतुकीत तात्पुरते बदल जाहीर केले आहेत.

वाहतूक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, आज २८ मे रोजी सकाळी ६ वाजल्यापासून नमाज पठण पूर्ण होईपर्यंत मम्मादेवी चौक ते गोळीबार मैदान चौक, ढोले पाटील (सेव्हन लव्हज) चौक ते गोळीबार मैदान चौक तसेच सीडीओ चौक ते गोळीबार मैदान चौक या मार्गांवरील सर्व प्रकारच्या वाहनांची वाहतूक आवश्यकतेनुसार वळवण्यात येणार आहे.

PUNE TRAFFIC DIVERSION ANNOUNCED FOR BAKRI EID PRAYERS AT GOLIBAR MAIDAN
Shocking : धक्कादायक! प्रसिद्ध रिलस्टारची आत्महत्या, हॉटेलमध्ये आढळला मृतदेह

यावेळी भैरोबानाला ते गोळीबार चौकाकडे जाणारी वाहतूक सकाळी ६ ते ११.३० वाजेपर्यंत बंद राहणार आहे. तसेच मम्मादेवी चौक, सीडीओ चौक, सेव्हन लव्हज चौक आणि जुनी सोलापूर बाजार चौकी चौक येथून गोळीबार चौकाकडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही. लुल्लानगर चौकातून गोळीबार परिसराकडे येणाऱ्या जड मालवाहू वाहनांसह एसटी आणि पीएमपीएमएल बस वाहतुकीलाही तात्पुरती मनाई करण्यात आली आहे.

PUNE TRAFFIC DIVERSION ANNOUNCED FOR BAKRI EID PRAYERS AT GOLIBAR MAIDAN
Mahanagar Gas Limited : पेट्रोल-डिझेलनंतर गॅसचं संकट! महानगरचा PNG-CNG वर मोठा निर्णय, सर्व सबसिडी आणि योजना बंद

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्गांची व्यवस्था करण्यात आली आहे. स्वारगेटकडे जाणारी जड वाहने प्रिन्स ऑफ वेल्स रोडमार्गे लुल्लानगर चौकातून पुढे जातील, तर पुणे स्टेशनकडे जाणाऱ्या हलक्या वाहनांना इम्प्रेस गार्डन रोडचा वापर करता येणार आहे. मम्मादेवी चौकातील वाहने बिशप स्कूल किंवा कमांड हॉस्पिटल मार्गे पुढे जाऊ शकतील. लुल्लानगरकडून येणाऱ्या वाहनांसाठी सीडीओ चौकातून डावीकडे वळण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच खटाव बंगला चौकातील ‘राईट टर्न बॅन’ तात्पुरता हटविण्यात आला असून, वाहनचालकांना नेपियर रोडमार्गे पुढे जाता येणार आहे. वाहतूक पोलिसांनी नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com