PMP Bonus Saam Tv
मुंबई/पुणे

PMC Bonus: पुणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार! सातव्या वेतन आयोगाच्या फरकासह बोनस जाहीर

PMC And PMPML Bonus: पुणे महानगरपालिका आणि पीएमपीएल कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता कर्मचाऱ्यांच्या बोनससाठी निधी वितरित करण्यात आला आहे.

Siddhi Hande

पुण्यातील नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पीएमपी कर्मचाऱ्यांना ऐन दिवाळीत गोड बातमी मिळाली आहे. सातव्या वेतन आयोगाच्या फरकासह बोनसचा निधी मंजूर झाला आहे. आता पुणे महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना लवकरच बोनस मिळणार आहे.

पीएमपी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाच्या फरकाच्या रकमेचा दुसरा हप्ता अदा जाहीर करण्यात आला आहे.हा हप्ता देण्यासाठी महापालिकेच्या स्थायी समितीने ८४.१५ कोटी रुपयांसह महापालिका कर्मचारी,शालेय विद्यार्थी तसेच सवलतीसाठी दिल्या जाणाऱ्या पाससाठी २० कोटींचा निधी देण्यास मान्यता दिली आहे.

शुक्रवारी हा निधी पीएमपीएमएलला जमा करण्यात आला.पीएमपी कर्मचाऱ्यांना वेतन आयोगाच्या फरकासह बोनस मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून, या कर्मचाऱ्यांची दिवाळीही गोड झाली आहे.

शासन निर्णयानुसार, पीएमपीच्या संचलनातून निर्माण होणारी आर्थिक तूट पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका स्वतःच्या उत्पन्नातून भागवत आहेत. सातवा वेतन आयोग फरकाची रक्कम ही संचलन तुटीचा भाग मानून,त्याची तरतूद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

प्रशासनाने ठेवलेल्या पत्रानुसार २६ ऑगस्ट २०२४ रोजी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सातव्या वेतन आयोगाचा फरक चार हप्त्यांमध्ये देण्याचा निर्णय झाला होता.

त्यानुसार सन २०२५-२६ च्या अंदाजपत्रकात या संदर्भात तरतूद सुचवून पीएमपीकडून महापालिकेला पत्र पाठवले गेले होते.

महापालिकेचा ६० टक्के हिस्सा म्हणून ८४.१५ कोटी रुपये देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीसमोर ठेवला होता. समितीने मंजुरी दिल्यामुळे पीएमपी कर्मचाऱ्यांना दुसरा हप्ता अदा करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच, सवलतीच्या पाससाठीचा निधीही मंजूर करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today : ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! सोन्याच्या दरात मोठा बदल; चांदी १०,००० रुपयांनी घसरली; वाचा आजचे ताजे दर

पोटावरची चरबी मेणासारबी वितळेल! रोज न चुकता मेथीच्या दाण्याचे पाणी प्या

Famous Actor : "मला बापाला मरताना नाही पाहायचंय..."; प्रसिद्ध अभिनेत्याच्या वडिलांची प्रकृती चिंताजनक, ढसाढसा रडतानाचा VIDEO व्हायरल

Maharashtra News Live Update: कालच्या मुसळधार पावसानंतर नाशिकला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण ७० टक्के भरले

Train Cancelled : प्रवाशांसाठी मोठी बातमी! साईनगर शिर्डी एक्सप्रेससह ८ रेल्वे आज रद्द, नेमकं कारण काय? वाचा

SCROLL FOR NEXT