Pune Municipal Corporation officer suspension details Saam TV Marathi News
मुंबई/पुणे

Transferred : ऐन दिवाळीत पुणे महापालिकेत खळबळ, सहाय्यक आयुक्तांची उचलबांगडी, तिघांचे निलंबन, नेमकं प्रकरण काय?

PMC Assistant Commissioner Transferred News : पुणे महापालिकेत ऐन दिवाळीत मोठी कारवाई करण्यात आली आहे. सहाय्यक आयुक्त बाळासाहेब ढवळे-पाटील यांची उचलबांगडी करण्यात आली असून, कनिष्ठ अभियंत्यासह तिघांचे निलंबन करण्यात आले आहे.

Akshay Badve, Namdeo Kumbhar

Pune Municipal Corporation Latest Marathi News : पुणे महानगर पालिकेच्या निवडणुका काही महिन्यात लागणार आहेत. त्याची तयारी आता जवळपास पूर्ण होत आहे. दिवाळीनंतर कोणत्याही क्षणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा होणार आहे. पुणे महानगर पालिकेचीही निवडणूक लागणार आहे. पण त्याआधीच महापालिकेत खळबळ उडाली आहे. सहाय्यक आयुक्त बाळासाहेब ढवळे-पाटील यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. त्याशिवाय कनिष्ठ अभियंत्यासह तिघांचे निलबंन करण्यात आलेय. या कारवाईनंतर पुणे मनपामध्ये एकच खळबळ उडाली आहे.

आयुक्तांनी का केली कारवाई ? Assistant Commissioner Balasaheb Dhawale-Patil transferred reason

महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी कामचोर अधिकाऱ्यांना चांगलाच इंगा दाखवला आहे. आयुक्तांनी पुण्यातील शेवाळवाडी आणि मांजरी परिसरात नुकतीच पाहणी केली होती. या पाहणीनंतर अस्वच्छता, रस्त्यांवरील खड्डे, नाल्यांमधील सांडपाण्याचा प्रवाह, अतिक्रमण दिसल्याने आयुक्तांनी संताप व्यक्त केला. आयुक्तांनी नगर रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्त आणि हडपसर क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब ढवळे-पाटील यांच्यासह दोन उप अभियंत्यांची तडकाफडकी उचलबांगडी केली.

कुणाची उचलबांगडी अन् कुणाचे निलंबन? Naval Kishore Ram action on lazy officers

कनिष्ठ अभियंत्यासह तिघांचे निलंबन केल्यामुळे पालिका प्रशासनात खळबळ उडाली आहे. पुणे उपनगरांमधील विदारक स्थिती पाहिल्याने आयुक्तांनी कडक भूमिका घेण्याचा निर्णय घेत ढवळे पाटील यांनी तातडीने या पदावरून बदली करण्याचे आदेश दिले. मलनिःसारण विभागाचे शाखा अभियंता, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे आरोग्य निरीक्षक आणि मुकादम व्यवस्थित काम करत नसल्याने या तिघांचे थेट निलंबन केले आहे.

अन्यथा घरी बसा, आयुक्तांचा दम Pune Municipal Commissioner Naval Kishore Ram takes strict action

पुणे महापालिकेतील समाविष्ट गावांमध्ये नागरी समस्या गंभीर झाल्या आहेत. त्यामुळे आयुक्तांनी या भागात जाऊन पाहणी केली. तसेच, नागरिकांशी संवाद साधून समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर कामचोर अधिकाऱ्यांना धारेवर धरले. "काम करा, अन्यथा घरी बसा' असा दम आयुक्तांनी दिल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : उल्हासनगरमध्ये ऑफिस खुर्ची बनवणाऱ्या कारखान्याला मध्यरात्री भीषण आग

BMC elections : मी मोदींचा भक्त, मुंबईवर भाजपचं कमळ फुलणारच, महेश कोठारे काय म्हणाले?

Fact Check : पंतप्रधान मोदी देणार 5 हजारांचं गिफ्ट? व्हायरल मेसेजमागचं सत्य काय? VIDEO

Diwali 2025 Shani Vakri: दिवाळीला बऱ्याच वर्षांनी होणार शनी वक्री; 'या' राशींना मिळणार शनीचा आशिर्वाद

Shaniwarwada Namaz Row: नमाजपठणवरुन महायुतीत जुंपली; मेधाताईंना अटक करण्याची ठोंबरेंची मागणी

SCROLL FOR NEXT