IND vs AUS : कोहली-रोहितची आज अग्निपरीक्षा, पर्थमध्ये पहिला वनडे, वाचा प्लेईंग ११ अन् सर्वकाही

IND vs AUS 1st ODI 2025 full playing 11 : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आजपासून वनडे मालिकेला सुरुवात होत आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांची पुनरागमनानंतर पहिली परीक्षा आज पर्थमध्ये होणार आहे. २०२७ विश्वचषक डोळ्यासमोर ठेवून दोघेही या मालिकेत स्वत:ला सिद्ध करण्यास उत्सुक आहेत. वाचा संपूर्ण प्लेइंग ११ आणि विशेष माहिती.
Virat Kohli and Rohit Sharma
Virat Kohli and Rohit SharmaSaam TV Marathi News
Published On

India vs Australia ODI: चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर विराट कोहली अन् रोहित शर्मा टीम इंडियात परतले आहे. सात महिन्यात भारतीय संघाचा चेहरामोहरा बदलला आहे. टी२० अन् कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघ विराट-रोहितला मागे सारून पुढे गेला आहे. आता वनडे क्रिकेटमध्ये दोन्ही दिग्गजांचा अनुभव युवा खेळाडूंना (Kohli and Rohit comeback match highlights) काय नवीन देणार? याकडे क्रीडाविश्वाचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे २०२७ चा विश्वचषक खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या विराट अन् रोहित शर्माचीही अग्निपरीक्षा असेल. दोघांना संघातील स्थान टिकवण्यासाठी आपल्या कामगिरीत सातत्या राखावं लागणार आहे. (IND vs AUS 1st ODI: Kohli & Rohit’s Big Test Begins in Perth – Full Playing 11 Inside)

सात महिन्यापूर्वी चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरल्यानंतर रोहित अन् विराट (Perth ODI match India Australia live updates) पहिल्यांदाच मैदानावर उतरणार आहे. ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्या संघाविरोधात दोन्ही दिग्गजांना लय पकडावी लागणार आहे. शुभमन गिल याच्या नेतृत्वात विराट कोहली अन् रोहित शर्मा या दोन दिग्गजांना पुन्हा एकदा स्वत:ला सिद्ध करावे लागणार आहे. २०२७ च्या विश्वचषकाच्या तयारीसाठी टीम इंडियाला पुढील दोन वर्षे महत्त्वाची असतील. पर्थमध्ये ऑस्ट्रोलियाविरोधात त्याच अभियानाची सुरूवात होणार आहे.

Virat Kohli and Rohit Sharma
Mumbai-Pune Electric Highway : मुंबई-पुण्याचा प्रवास आता आणखी स्वस्तात, इलेक्ट्रिक हायवेमुळे होणार फायदाच फायदा, वाचा सविस्तर

२०२७ ची तयारी -

पहिल्या एकदिवसीय सामन्याआधी विराट कोहली अन् रोहित शर्मा यांनी नेटमध्ये कसून सराव केला. रोहित शर्माने ११ किलो वजन कमी करत आपण २०२७ साठी तयार असल्याचं सांगितलं, तर दुसरीकडे विराट कोहलीने लंडनमध्ये खासगी ट्रेनरसोबत फिटनेसवर काम केलेय. चॅम्पियन्स ट्रॉफी, आयपीएलनंतर दोन्ही दिग्गजांनी एकही सामना खेळलेला नाही. त्यामुळे त्यांची आजपासून अग्निपरीक्षा सुरू होणार असल्याचे मत क्रीडा विश्लेषकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. पण ऑस्ट्रेलियाविरोधातील रेकॉर्ड विराट अन् रोहित शर्मा या दोघांनाही आत्मविश्वास देणारा असेल.

Virat Kohli and Rohit Sharma
Garib Rath Express : ब्रेकिंग न्यूज! गरीब रथ ट्रेनच्या ३ एसी बोगीला भयंकर आग, प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण

करिअरची दिशा ठरवणारी मालिका -

टी२० अन् कसोटीमध्ये निवृत्ती घेणाऱ्या विराट अन् रहितसाठी ही वनडे मालिका पुढील करिअरची दिशा दाखवणारी असेल.

रोहित शर्माला आता सिनिअर खेळाडूची भूमिका बजावावी लागणार आहे. त्याच्या नेतृत्वात भारताने टी२० वर्ल्डकप अन् चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरलेय. मेलबर्न कसोटीतही तो कर्णधार राहिलाय.

रोहित शर्माकडून दमदार सलामी अन् विराट कोहलीकडून धावांच्या पावसाची अपेक्षा सर्वांनाच असेल. या मालिकेतील कामगिरीनंतर दोघांच्या पुढील करिअरची दिशा ठरणार आहे. मिचेल स्टार्क अन् जोश हेजलवूड यांच्या आव्हानाचा सामना या दोघांना करावा लागणार आहे.

रोहित-विराट यांना आपली संघातील जागा निश्चित नसल्याची कल्पना आहेच. निवड समिती अन् कोच २०२७ चा विश्वचषक डोळ्यासमोर ठेवून कठोर निर्णय घेऊ शकते, याबाबत दोन्ही खेळाडूंच्या मनात कोणताही संकोच नसेलच. अजित आगरकर यांनी याबाबत अधिच स्पष्ट केलेय.

Virat Kohli and Rohit Sharma
Samruddhi Expressway : समृद्धीवर पाहुण्यांच्या कारचा भीषण अपघात, बाप-लेकाचा जागेवरच मृत्यू, कारचा चक्काचूर

प्लेईंग ११ कशी असेल?

रोहित शर्मा अन् शुभमन गिल डावाची सुरूवात करतील. अनुभवी विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करेल. तर श्रेयस अय्यर हा चौथ्या अन् केएल राहुल पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरणार आहे. यशस्वी जायस्वाल याला संघात स्थान मिळण्याची शक्यता कमीच आहे. केएल राहुल विकेटकीपरची भूमिका बजावणार आहे. सहाव्या आणि सातव्या क्रमांकावर भारतीय संघ अष्टपैलू खेळाडूंना स्थान देऊ शकते. त्यासाठी अक्षर पटेल अन् नितीशकुमार रेड्डी यांचा पर्याय असेल. तर गोलंदाजीमध्ये मोहम्मद सिराज अन् अर्शदीप सिंह यांच स्थान निश्चित मानले जातेय. तर हर्षित राणा अथवा प्रसिद्ध कृष्णा यांच्यामधील एका खेळाडूला प्लेईंग ११ मध्ये स्थान मिळणार आहे. दुसरीकडे कुलदीप यादव अन् वॉशिंगटन सुंदर यांच्यापैकी एकजण प्लेईंग ११ चा भाग असू शकते. भारतीय संघ फलंदाजी मजबूत करण्याचा विचार करत असेल तर हर्षित राणा अन् सुंदर यांचे स्थान निश्चित मानले जाते.

Virat Kohli and Rohit Sharma
Pune crime : विकृतीचा कळस! पुण्यात भटक्या कुत्र्यावर लैंगिक अत्याचार, तरुणाचं काळं कांड व्हिडिओत कैद

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com