Mumbai-Pune Electric Highway : मुंबई-पुण्याचा प्रवास आता आणखी स्वस्तात, इलेक्ट्रिक हायवेमुळे होणार फायदाच फायदा, वाचा सविस्तर

Mumbai Pune electric highway benefits : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई-पुणे इलेक्ट्रिक हायवे कॉरिडॉरचं उद्घाटन केलं आहे. हा भारतातील पहिला इलेक्ट्रिक महामार्ग असून, प्रवास जलद, स्वस्त आणि पर्यावरणपूरक बनवेल. २०२८ पर्यंत हा महामार्ग पूर्ण होणार असून महाराष्ट्राच्या हरित औद्योगिक विकासाचं प्रतीक ठरणार आहे.
Mumbai-Pune
Devendra Fadnavis launches India’s first Mumbai-Pune Electric Highway, a step toward green mobility.Saam Tv
Published On

Mumbai-Pune Electric Highway Launched: मुंबई-पुणेकरांच्या सेवेत आणखी एका महामार्गाची भर पडणार आहे. या दोन शहराला जोडण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून इलेक्ट्रिक हायवेची (India’s first electric highway launch 2025) निर्मिती करण्यात येणार आहे. गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई-पुणे इलेक्ट्रिक हायवे कॉरिडोअर लाँच केला. हा भारतामधील पहिला इलेक्ट्रिक हायवे असेल. यामुळे मुंबई-पुणे प्रवास वेगात होईलच. त्याशिवाय प्रदूषण कमी झाल्यामुळे (Mumbai Pune electric highway benefits) पुणे अन् मुंबईसारख्या शहराच्या हवेची गुणवत्ता सुधारेल. भविष्यात इलेक्ट्रिक वाहनांच्या वाढत्या वापरामुळे शहरांची हवा स्वच्छ होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे, देशातील पहिला एक्सप्रेस वे हा मुंबई आणि पुणे या दोन शहरांच्या दरम्यानच झाला होता. आता इलेक्ट्रिक हायवेची सुरूवातही याच दोन शहरांच्या दरम्यान सुरूवात होणार आहे. (Devendra Fadnavis Launches India’s First Electric Highway Between Mumbai and Pune)

मुंबई आणि पुणे या दोन शहरांना जोडणारा इलेक्ट्रिक हायवे तीन वर्षांत म्हणजेच २०२८ पर्यंत वाहतुकीसाठी खुला (Maharashtra green expressway plan 2028) होईल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या महामार्गामुळे पुणे-मुंबई दोन शहरातील प्रवास, मालवाहतूक जलद आणि सुरक्षित होईलच. त्याशिवाय हा प्रवासामुळे पैसेही वाचणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते देशातील पहिल्या इलेक्ट्रिक हायवेचे उद्घाटन झाले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, हा महामार्ग महाराष्ट्राच्या हरित औद्योगिक ताकदीचे प्रतीक ठरेल. त्याशिवाय भारताला स्वावलंबी आणि पर्यावरण चांगले बनवण्यासाठी महत्त्वाचा उपक्रम ठरणार आहे. (Electric vehicle charging highway Maharashtra)

Mumbai-Pune
Samruddhi Expressway : समृद्धीवर पाहुण्यांच्या कारचा भीषण अपघात, बाप-लेकाचा जागेवरच मृत्यू, कारचा चक्काचूर

हा इलेक्ट्रिक महामार्ग मुंबई आणि पुण्याला भारतातील शाश्वत लॉजिस्टिक्सचे केंद्र म्हणून स्थान देईल. इलेक्ट्रॉनिक वाहनांच्या वाहतुकीमुळे प्रदूषण कमी होईल. वाहतक वेगवान होण्यासाठी हायवेवर योग्य ठिकाणी बॅटरी-स्वॅप आणि चार्जिंग स्टेशन स्थापन केले जातील. महाराष्ट्र सरकार आता राज्यभरात असे आणखी इलेक्ट्रिक हायवे बांधण्याची योजना आखत आहे. राज्यात सौर ऊर्जा निर्मितीला गती देण्यात येत असून २०३५ पर्यंत ७० टक्के ऊर्जेचा वापर सौर स्रोताद्वारे करण्यात येणार असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.

Mumbai-Pune
IMD Weather Alert: धनत्रयोदशीला आस्मानी संकट येणार, ४८ तास पाऊस धो धो कोसळणार, IMD कडून गंभीर इशारा

महाराष्ट्र सरकारने ईव्ही क्षेत्राला प्रोत्साहन देण्याचे धोरण तसेच पर्यायी इंधन धोरण अशी शाश्वत धोरणे स्वीकारली असून या क्षेत्रातील उद्योगाला त्याचा फायदा व्हावा आणि पर्यावरणाचे या माध्यमातून रक्षण व्हावे हे आहे. महाराष्ट्र शासन मुंबई-पुणे इलेक्ट्रीक कॉरिडोअरसाठी तसेच अन्यत्रही बॅटरी स्वॅपींग आणि चार्जिंगच्या कॉरिडॉरसाठी ब्ल्यू एनर्जीसोबत काम करेल.या ट्रकच्या किंमती डिझेल वाहनांशी स्पर्धा करणाऱ्या असल्याने या वाहनांना चांगला प्रतिसाद मिळेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

Mumbai-Pune
IMD Weather Alert: धनत्रयोदशीला आस्मानी संकट येणार, ४८ तास पाऊस धो धो कोसळणार, IMD कडून गंभीर इशारा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com