Holi 2026 : होळीचा पक्का रंग निघत नाही? 'हा' घरगुती उपाय करा, चेहरा अन् हात-पाय पुन्हा चंद्रासारखे चमकतील

Shreya Maskar

होळी 2026

यंदा 3 मार्चला होळी हा सण आला आहे. होळीला रंग खेळताना आपल्या त्वचेची विशेष काळजी घ्या. होळीला चेहऱ्याला पक्का रंग लागला असेल, तर घरगुती उपायांनी चेहरा स्वच्छ करा.

Holi | yandex

खोबरेल तेल

रंग खेळायला जाण्याआधी शरीराला भरपूर खोबरेल तेल लावा. जेणेकरून रंग चेहऱ्याला लागणार नाही. तसेच शरीराला कव्हर करतील असे कपडे घाला. शॉर्ट ड्रेस घालणे टाळा.

Coconut oil | yandex

मॉइश्चरायझर

त्यानंतर शरीराला मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन दोन्हीही समप्रमाणात लावा. यामुळे त्वचेवर थर तयार होतील, ज्यामुळे कोणताही रंग थेट तुमच्या त्वचेला लागणार नाही.

Moisturizer | yandex

पक्का रंग कसा काढावा?

रंग खेळून आल्यावर रंग सुकण्याआधी शरीर स्वच्छ करा. कोमट पाण्याने आंघोळ करा. एका बाऊलमध्ये बेसन पीठ आणि तेल मिक्स करून संपूर्ण शरीराला लावा.

Holi | yandex

तांदळाचे पीठ

त्यानंतर एका बाऊलमध्ये तांदळाचे पीठ, बेसन पीठ, दूध आणि लिंबाचा रस एकत्र करून त्वचेवर चोळा. तांदळामुळे त्वचा उजळ होण्यास मदत करते आणि पक्का रंग देखील निघून जातो.

Rice flour | yandex

कोरफडी

होळीचा पक्का रंग काढण्यासाठी कोरफडीचा गर खूप जास्त फायदेशीर आहे. कोरफडीचा गर ओल्या त्वचेला लावल्यास रंग सिंपल पद्धतीने काढता येतो.

Aloe vera | yandex

महत्त्वाची टीप

रंग काढण्यासाठी गरम पाणी वापरू नका, त्यामुळे रंग त्वचेत अधिक पक्का बसतो. अशावेळी कायम कोमट आणि थंड पाण्याचा वापर करावा.

Holi | yandex

टीप

घरगुती कोणतेही प्रोडक्ट चेहऱ्यावर लावताना सर्वात आधी त्याची पॅच टेस्ट करा. कारण आपली त्वचा खूप संवेदनशील असते.

Holi | yandex

NEXT : पांढऱ्या शुभ्र साडीवर उठून दिसतील 'या' रंगांचे ब्लाउज, होळीला सर्वांपेक्षा तुम्हीच हटके दिसाल

Holi Party 2026 | saam tv
येथे क्लिक करा...