Iqbal Darbar Founder of Darbar Band Saam tv news
मुंबई/पुणे

Iqbal Darbar: पुण्यातील संगीतप्रेमींवर शोककळा; 'दरबार बँड'चे संस्थापक इकबाल दरबार यांचे निधन

Pune Mourns the Loss of Iqbal Darbar: पुण्यातील प्रसिद्ध दरबार बँडचे संस्थापक इकबाल दरबार यांचं निधन. गणेशोत्सवातील वादनासाठी ओळखले जाणारे दरबार सामाजिक कार्यातही सक्रीय होते. वयाच्या ७७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Bhagyashree Kamble

पुण्यातील प्रसिद्ध 'दरबार बँड'चे संस्थापक संचालक इकबाल दरबार यांचे निधन झाले आहे. वयाच्या ७७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात तीन मुले आणि एक मुलगा, नातवंडे असा परिवार आहे.

इकबाल दरबार हे केवळ बँड संचालक नव्हते, तर ते प्रसिद्ध सेक्सोफोन वादक देखील होते. गायक मोहम्मद रफी यांचे कट्टर चाहते म्हणूनही त्यांची ओळख आहे. पुण्यातील अनेक प्रमुख गणेश मंडळांच्या प्राणप्रतिष्ठा आणि विसर्जन मिरवणुकांमध्येर दरबार बँडचे वादन ही परंपरा होती. यासाठी इकबाल दरबार स्वत: उपस्थित असायचे. त्यांच्या निधनानंतर पुण्यातील संगीतप्रेमींमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

ऑर्केस्ट्रा ही संकल्पना महाराष्ट्रात रूजवणाऱ्या काही मोजक्या कलावंतांमध्ये इकबाल दरबार यांचं नाव सन्मानाने घेतले जाते. त्यांच्या वादानाचे चाहते केवळ पुणे मर्यादित नसून, संपूर्ण भारतभर त्यांच्या कलाकृतीने मंत्रमुग्ध व्हायचे. अनेक दिग्गज कलाकारही त्यांच्या चाहत्यांमध्ये होते.

इकबाल दरबार फक्त संगीतापुरते मर्यादित नसून, सामाजिक कार्यात देखील त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. विशेष म्हणजे पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपती विसर्जन मिरवणुकीची सुरूवात त्यांच्या बँडद्वारे सादर केलेल्या आरतीमुळेच होत असे.

इकबाल दरबार यांनी सीमेवर जाऊन भारतीय जवानांचे मनोरंजन केले आहे. कार्यक्रमातून मिळालेला निधी त्यांनी कधीही स्वत:साठी वापरला नाही. 'दरबार कृतज्ञता निधी' म्हणून त्यांनी सैन्याला दिले आहे.

इकबाल दरबार यांनी मोहम्मद रफी आर्ट फाउंडेशन सुरू केली होती. या संस्थेची स्थापना करून गरजू कलाकारांना वैद्यकीय आणि आर्थिक मदतीचा हात दिला. तसेच बँडमधील कलाकार व्यसनमुक्त व्हावेत, यासाठीही त्यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांनी आयुष्यभर संगीताने जनतेला आनंद दिला आणि सामाजिक सलोखाही जपला. त्यांच्या निधनानंतर चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight Loss Tips: वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतील 'ही' योगासने, आताच सवय लावून घ्या

Nana Patekar: तनुश्री दत्ताचा पुन्हा नानांवर आरोप; माझा छळ होतोय

Maharashtra Live News Update: पुणे शहरात अल्पवयीन तरुणाकडून वाहनांची तोडफोड

Wardha News: धक्कादायक! बेशुद्ध रुग्णाच्या अंगावर चढल्या मुंग्या,हिंगणघाटच्या शासकीय रुग्णालयातील प्रकार

Malaria: 'ही' लक्षणे दिसताच वेळीच व्हा सावध, असू शकतो मलेरिया

SCROLL FOR NEXT