mother killed her own son SaamTV
मुंबई/पुणे

पुणे हादरले! मुलाची हत्या केली अन् बॅगमध्ये भरलं; दगड बांधून विहिरीत फेकलं, तिसऱ्या लग्नासाठी आई झाली कैदासीण

Pune crime news today : पुण्यातील शिरूरमध्ये आईनेच आपल्या मुलाची हत्या करून मृतदेह विहिरीत टाकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तिसऱ्या लग्नासाठी मुलाचा काटा काढल्याचा आरोप असून पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.

Namdeo Kumbhar

Pune crime, mother kills son : तिसर्‍या लग्नासाठी आईनेच आपल्या ११ वर्षाच्या चिमुकल्याची हत्या केल्याची खळबळजनक घटना पुण्यात घडली आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणी २२ वर्षाच्या महिलेला बेड्या ठोकल्या आहेत. महिलेने ११ वर्षाच्या मुलाची हत्या केली. त्यानंतर मृतदेह बॅगमध्ये ठेवला. दगड बांधून बॅग विहिरीत फेकल्याची संतापजनक घटना घडली आहे. शिरूर तालुक्यात मानवतेला काळिमा फासणारी घटना घडली आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास केला जात आहे. आरोपी महिलेचे नाव पूजा पवार असे आहे.

२२ वर्षाच्या पूजा रविंद्र पवार हिला तिसरे लग्न करायचे होते. पण त्यामध्ये ११ वर्षाच्या मुलाचा अडथळा येत होता. त्यामुळे तिने काळजाच्या तुकड्यालाच संपवण्याचा निर्णय घेतला. पूजाने त्या बाळाची हत्या केली. पुरावे मिटवण्यासाठी पूजाने मृतदेह बॅगमधून भरला अन् दगड बांधून विहिरीत फेकला. दुसऱ्या लग्नापासून झालेला मुलगा तिसऱ्या लग्नासाठी अडथळा बनू नये, त्यामुळे तिनेच काळजाच्या तुकड्याची हत्या केली. रंजगांव एमआयडीसी पोलिसांनी पूजा चव्हाण हिला आज ११ महिन्याच्या यशची हत्या केल्याचा आरोपाखाली अटक केली आहे. पूजाने महिनाभरापूर्वी यशची हत्या केली होती. पूजा ही शिरूर तालुक्यातील भंभारडे गावातील राहणारी आहे.

बाळाला घेऊन घरातून निघाली, पण...

पोलीस अधिकारी महादेव वाघमारे आणि त्यांच्या पथकाकडून या प्रकरणाचा तपास केला जात आहे. ५ एप्रिल रोजी पूजाचा पती रविंद्र अशोक पवार यांनी पोलिसांत तक्रार दिली होती. पूजा ८ मार्च रोजी ११ महिन्याच्या यशला घेऊन घरातून गेली, परतलेली नाही. दरम्यान, याआधीही पूजा मुलाला घेऊन घरातून निघून गेली होती. त्यामुळे रविंद्र पवार यांनी तात्काळ पोलिसांना संपर्क केला नव्हता. पण खूप दिवस गेल्यामुळे रविंद्र यांनी अखेर पोलिसांत आई आणि बाळ बेपत्ता झाल्याची तक्रार दिली.

पूजाने सांगितली खोटी स्टोरी -

रविंद्र यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी काही तासांतच शिरूरमधील जांबूत गावातून पूजाला शोधले. पोलिसांकडून पूजाची विचारपूस केली. पण पूजाने उडवाउडवीची उत्तरे दिली. ८ मार्च रोजी मूल प्लॅटफॉर्मवरून पडले अन् डोक्याला दुखापत झाल्यामुळे मृत्यू झाले. धक्क्यामध्ये असल्यामुळे मृतदेह विहिरीत टाकल्याचे तिने पोलिसांना सांगितले. पण पोलिसांनी तात्काळ विहिरीतून कुजलेला मृतदेह बाहेर काढला अन् पंचनामा केला. कुजलेला मृतदेह पोलिसांनी पोस्टमार्टमसाठी पाठवला. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये डोक्याला दुखापत झाल्यामुळे नव्हे तर जोरात आघातामुळे झाल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांकडून पूजाला खाकी दाखवली. त्यानंतर पूजाने गुन्हा कबूल केल्याची माहिती मिळाली.

पूजाने ११ महिन्याची हत्या का केली ?

रविंद्र हे पूजाचे दुसरे पती होते. पण गेल्या काही दिवसांपासून नवरा-बायकोचा सतत वाद होत होते. त्यामुळे पूजाला तिसरे लग्न करायचे होते. पण यामध्ये मुलगा अडथळा ठरत होता. ८ मार्च रोजी ११ महिन्याचा यश सारखा रडत होता. त्यामुळे ती वैतागली होती. त्या रागाच्या भरात पूजाने त्या बाळाची दगडावर आदळून हत्या केली. हत्या लपवण्यासाठी पूजाने मृतदेह बॅगमध्ये भरला आणि दगड बांधून विहिरीत फेकला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashok Kharat: अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट, अश्लील व्हिडिओची १५ ते २० रूपयांत विक्री

Plain Saree Designs: ऑफिसमध्ये सुंदर दिसण्यासाठी नेसा 'या' 5 रंगाच्या प्लेन साड्या

Heart oxygen deficiency: धाप लागतेय, थकवा जाणवतोय? हृदयाला रक्तपुरवठा न होणाऱ्या ४ लक्षणांकडे इग्नोर करू नका

EPFO 3.0 Update : आता बॅंकेत जायची गरज नाही, UPI द्वारे काढा PF; एकावेळी किती पैसे काढता येणार?

Tumbbadchi Manjula: तुंबाडची मंजुळा नक्की कोण? मकरंद अनासपुरे, सई ताम्हणकर, जितेंद्र जोशीची कोकणातली हॉरर स्टोरी

SCROLL FOR NEXT