Hemant Rasane vs Ravindra Dhangekar Saam TV marathi News
मुंबई/पुणे

Pune : पुण्यात शिवसेना-भाजप संघर्ष? रासनेंचा धंगेकरांना अप्रत्यक्ष टोला; म्हणाले, घरातील खोडकर मुलांना घेऊन पुढे जायचं

Hemant Rasane vs Ravindra Dhangekar : पुण्यातील कसबा मतदारसंघात आमदार हेमंत रासने यांनी पाहणी दौऱ्यात माजी प्रतिस्पर्धी रवींद्र धंगेकर यांच्यावर अप्रत्यक्ष टोला लगावला. "घरातील खोडकर मुलांनाही घेऊन पुढे जायचं असतं" असे वक्तव्य केलेय.

Akshay Badve, Namdeo Kumbhar

What Hemant Rasane said about Dhangekar during Kasba visit : घरातील कुटुंब प्रमुखाची भूमिका आपण पार पाडायचं ठरवला आहे. घरात लहान मुलं असतात ती थोडीशी खोडकर असतात पण त्यांना सुद्धा बरोबर घेऊन जायचं असतं, असा टोला पुणे शहरातील कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने यांनी अप्रत्यक्षपणे एकेकाळी त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले आणि आत्ता महायुतीच्या शिवसेनेतील नेते रवींद्र धंगेकर यांना लगावला आहे.

पुणे शहरातील कसबा विधानसभा मतदारसंघात आमदार रासने यांच्यासह पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आज पाहणी दौरा केला. यावेळी आमदार हेमंत रासने यांच्यासह पुणे महानगरपालिकेच्या आयुक्त नवल किशोर राम, अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलिस उपआयुक्त कृषिकेश रावले यासह अनेक जणं या पाहणीवेळी उपस्थित होते.

शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांच्याकडून महायुतीच्या नेत्यांच्या विरोधात होणाऱ्या टीकेबद्दल रासने यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, "राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ यांनी सांगितला आहे की आपण मोठे भाऊ आहोत. कोणी काही बोललो तरी आपण बोलायचं नाही. घरातील कुटुंब प्रमुखाची आणि मोठ्या भावाची भूमिका आपण पार पाडायचं ठरवलं आहे. घरात लहान मुलं असतात ती थोडीशी खोडकर असतात यांना बरोबर घेऊन जायचं असतं. सगळ्यांना बरोबर घेऊन आम्ही महायुतीचा सत्ता आणणार. आमचे नेते देवा भाऊ आहेत त्यांनी सांगितलं आहे की दुधात मिठाचा खडा टाकायचा नाहीकारण आपण मोठे भाऊ आहोत, आपण ती जबाबदारी पार पाडायची."

"महायुती लढायच का वेगळं लढायचे हे आमचे वरिष्ठ नेते ठरवतील आणि पुणे महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकवला जाईल," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीवर रासने म्हणाले, "पुण्यातील गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्याचे कमी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पोलिस यंत्रणा वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गुन्हेगारी नियंत्रण आणण्यासाठी येत्या काळात आम्ही नक्की करू."

एक दिवस देश कसबा बघायला येईल

पुण्यातील राडा रोडा, वाहतूक कोंडी, कचरा यासारख्या समस्यांची पाहणी त्यांनी आज केली. पुण्यातील अनधिकृत फ्लेक्स बद्दल बोलताना रासने म्हणाले, "सातत्याने मी प्रशासनाच्या मागे लागलो आहे की अनधिकृत फ्लेक्स काढून टाका. इतर भागांच्या तुलनेत कसबा मध्ये कमी फ्लेक्सबाजी होते. इंदोर एकेकाळी १५, २० वर्षांपूर्वी खराब शहर होतं आज ते संपूर्ण देशात एक नंबरवर आहे. आमचा संकल्प आहे की एक दिवस आम्ही सगळा कसबा स्वच्छ करु आणि त्यादिवशी देश कसबा बघायला येतील."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुणे शहराला लवकरच मिळणार ५ नवीन पोलिस ठाणे

Food Safety Tips: कोणत्या भाज्या पुन्हा गरम करून खाऊ नयेत? अन्यथा...

Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात आणखी एक राजकीय भूकंप; काँग्रेसच्या बड्या नेत्याचा समर्थकांसह राजीनामा

Pune: महिला वकिलानं बलात्कार केल्याचा पुरुषाचा आरोप, कुठं-कुठं नेलं? तक्रारीत संपूर्ण घटनाक्रम सांगितला

Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचा भर सभेत थेट उदय सामंत यांना फोन, टाळ्यांचा कडकडाट, नेमके काय घडले? नंतर गडबड..., VIDEO

SCROLL FOR NEXT