Pune MHADA Lottery 2026 last date saam tv
मुंबई/पुणे

म्हाडाच्या ४,४६२ घरांसाठी अजूनही करता येणार अर्ज! मुदत वाढली; सोडतीची नवी तारीखही जाहीर

Pune MHADA Lottery 2026: पुणे म्हाडाच्या ४,४६२ घरांच्या सोडतीसाठी अर्ज करण्याची मुदत २२ ऑक्टोबरपर्यंत वाढवली. तांत्रिक अडचणींमुळे घेतलेल्या निर्णयासह सोडतीची नवीन तारीख जाणून घ्या.

Omkar Sonawane

म्हाडाच्या पुणे मंडळाच्या ४ हजार ४६२ घरांच्या सोडतीसाठी सध्या नोंदणी आणि अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रिया सुरू आहे. ही प्रक्रिया गुरुवार, १५ ऑक्टोबरला संपुष्टात येणार होती. मात्र, आता या प्रक्रियेला आठवडाभराची मुदतवाढ देण्यात आली आहे.अर्ज भरताना अर्जदारांना अनेक तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत असून, त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी होण्यासही विलंब होत आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने अर्जदारांच्या कागदपत्रांची पडताळणी अद्याप बाकी आहे. या पार्श्वभूमीवर पुणे मंडळाने नोंदणी आणि अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रियेला आठवडाभराची मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार, आता इच्छुकांना २२ ऑक्टोबरपर्यंत अर्ज भरून सादर करता येणार आहेत.

पुणे मंडळाला १५ टक्के एकात्मिक योजनेअंतर्गत १,४९१ घरे, तर २० टक्के सर्वसमावेशक योजनेअंतर्गत २,९७१ घरे सोडतीसाठी उपलब्ध झाली आहेत. या एकूण ४,४६२ घरांच्या सोडतीसाठी पुणे मंडळाने ऑगस्टमध्ये जाहिरात प्रसिद्ध करून नोंदणी आणि अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रियेला सुरुवात केली. ही प्रक्रिया १५ सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार होती. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे अनेक इच्छुकांना अर्ज भरता न आल्याने आणि अन्य कारणांमुळे मंडळाने या प्रक्रियेला मुदतवाढ दिली. त्यानुसार, नोंदणी आणि अर्जविक्री- स्वीकृती प्रक्रिया १५ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार होती. ही प्रक्रिया संपण्यासाठी केवळ दोन दिवस शिल्लक असताना, आता तिसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून तांत्रिक अडचणींमुळे अर्जदारांना अर्ज सादर करण्याची प्रक्रिया पूर्ण करता आलेली नाही.

महाआयटीच्या संगणकीय प्रणालीतील तांत्रिक बिघाडामुळे उत्पन्नाचा दाखला, प्राप्तिकर प्रमाणपत्र आणि वास्तव्याचा दाखला यांसारख्या कागदपत्रांची पडताळणी होण्यास विलंब होत आहे. त्यामुळे शेकडो अर्जदारांच्या कागदपत्रांची पडताळणी अद्याप पूर्ण झालेली नाही. नोंदणी आणि अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रिया संपण्यासाठी केवळ दोन दिवस शिल्लक असतानाही अनेक अर्जदारांच्या कागदपत्रांची पडताळणी अपूर्ण असल्याने त्यांना सोडतीत सहभागी होता येणार नव्हते. त्यामुळे या प्रक्रियेला मुदतवाढ देण्याची मागणी होत होती. या मागणीच्या पार्श्वभूमीवर प्रक्रियेला सात दिवसांची मुदतवाढ देण्याचा निर्णय पुणे मंडळाने घेतला. त्यानुसार, यासंबंधीच्या प्रस्तावाला म्हाडाच्या उपाध्यक्षांची मान्यता घेऊन मंगळवारी नोंदणी आणि अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती दिली.

आता ४ डिसेंबरला सोडत

सोडतीच्या मूळ वेळापत्रकानुसार, पुण्यातील ४,४६२ घरांसाठी १५ सप्टेंबरला सोडत काढली जाणार होती. मात्र, सोडतपूर्व प्रक्रियेला मुदतवाढ दिल्याने सोडतीची तारीख १३ ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर पुन्हा सोडतपूर्व प्रक्रियेला मुदतवाढ दिल्याने १३ ऑक्टोबरची सोडत २५ नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली. आता तांत्रिक अडचणींमुळे सोडतपूर्व प्रक्रियेला तिसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आल्याने सोडत पुन्हा लांबणीवर पडली आहे. या मुदतवाढीमुळे आता २५ नोव्हेंबरला होणारी सोडत ४ डिसेंबरला काढली जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुण्यासाठी रवाना

Bombay High Court: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय!

Maharashtra : महाराष्ट्रात FDA ची धडक कारवाई; ७८.४९ कोटींचे अन्नपदार्थ जप्त

महाराष्ट्राच्या दोन लेकींची मोठी झेप! क्रिकेट संघात मिळाली संधी

Upvasachi Lassi Recipe : नवरात्री स्पेशल! अवघ्या ५ मिनिटांत बनवा थंडगार मलाईदार लस्सी

SCROLL FOR NEXT