पुण्यात CBI चा मोठा छापा! MIL अधिकाऱ्याच्या घरातून १.७३ कोटींची रोकड जप्त, काय आहे प्रकरण?

CBI Raids In Pune : लाचखोरी प्रकरणात सीबीआयने म्युनिशन्स इंडिया लिमिटेडचे कार्यकारी संचालक अनिल कुमार यांच्या पुण्यातील निवासस्थानी कारवाई केली. या कारवाईत १ कोटी ७३ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आलीय.
CBI action in Pune's alleged MIL bribery case
CBI action in Pune's alleged MIL bribery case
Published On: 

लाचखोरी प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाकडून पुण्यात असलेल्या म्युनिशन्स इंडिया लिमिटेडच्या (एम आय एल) अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. म्युनिशन्स इंडिया लिमिटेडचे कार्यकारी संचालक अनिल कुमार यांच्या पुण्यातील निवासस्थानी १ कोटी ७३ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली असून त्यांच्यासह आणखी २ जणांना या प्रकरणात अटक करण्यात आली आहे.

CBI action in Pune's alleged MIL bribery case
आयटीआयमध्ये मिळणार पाळीव प्राण्यांची काळजी घेण्याचे प्रशिक्षण, रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार

म्युनिशन्स इंडिया लिमिटेड (एम आय एल) ही कंपनी भारतीय लष्कर, नौदल, हवाई दल आणि निमलष्करी दलांसाठी दारूगोळा व स्फोटकांची निर्मिती, चाचणी, संशोधन, विकास आणि विपणन करते. सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार, १२ ऑक्टोबर रोजी अनिल कुमार यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पुण्यातील म्युनिशन्स इंडिया लिमिटेडमध्ये कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत असताना त्यांनी काही खासगी कंत्राटदार आणि वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांशी करार केल्याचा आरोप आहे.

CBI action in Pune's alleged MIL bribery case
73 लाख किलो, 295 कंटेनर, 30 कोटी किंमत; पाकिस्तानातून भारतात आणलेल्या खडेमिठाचा असा झाला पर्दाफाश

सरकारी कामांमध्ये या कंत्राटदारांना फायदा मिळवून देण्याच्या बदल्यात लाचेची मागणी करून ती स्वीकारल्याचा संशय सीबीआयला आहे. ड्रोन तंत्रज्ञान आणि दारूगोळा निर्मिती आदी क्षेत्रांत कार्यरत असलेल्या एसएमपीपी लिमिटेडचे (SMPP Limited) मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच संचालक आशीष कंसल हे एम आय एल ला (म्युनिशन्स इंडिया लिमिटेड) हे अनिल कुमार यांच्या नियमित संपर्कात होते. एका वर्षाच्या कालावधीत दारूगोळा पुरवठा करण्यासाठी एस एम पी पी ला देण्यात आलेल्या ५०० कोटी रुपयांच्या अधिकृत कंत्राटासंदर्भात हा संपर्क झाला असल्याचा आरोप सी बी आय ने केला आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com