Pune MHADA Lottery Saam Tv
मुंबई/पुणे

Pune MHADA : पुणेकरांसाठी आनंदवार्ता! ४१८६ म्हाडाच्या घरांची उद्या सोडत; कुठे आणि कशी होणार? वाचा सविस्तर

Pune MHADA Lottery : पुणे म्हाडाच्या ४१८६ घरांची संगणकीय सोडत १० फेब्रुवारी रोजी होणार आहे. २.५८ लाख अर्जदारांनी अर्ज केला असून संपूर्ण माहिती वाचा.

Alisha Khedekar

  • पुणे म्हाडाच्या ४१८६ घरांची सोडत उद्या होणार

  • २.५८ लाखांहून अधिक अर्जदारांचा मोठा प्रतिसाद

  • जिल्हा परिषद सभागृहात दुपारी १२ वाजता कार्यक्रम होणार

  • ऑनलाईन लिंकद्वारेही सोडत पाहण्याची सुविधा उपलब्ध

पुणेकरांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. म्हाडाचा विभागीय घटक पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे जिल्ह्यातील विविध गृहनिर्माण प्रकल्पांतील ४१८६ घरांची विक्री होणार आहे.या विक्रीसाठी संगणकीय सोडत १० फेब्रुवारी म्हणजेच मंगळवारी दुपारी १२.०० वाजता काढण्यात येणार आहे. सभापती शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते ही संगणकीय सोडत काढण्यात येणार असल्याची घोषणा पुणे म्हाडा मार्फत करण्यात आली आहे.

पुणे मंडळातर्फे सोडतीसाठी ११ सप्टेंबर २०२५ रोजी ४१८६ घरांच्या विक्रीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. पुणे, पिपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील तसेच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत २० टक्के सर्वसमावेशक योजनेतील ३३२२ घरांचा आणि १५ टक्के सामाजिक गृहनिर्माण योजनेतील ८६४ घरांच्या सोडतीत समावेश करण्यात आला आहे.

अर्जदारांच्या विनंतीनुसार, काही तांत्रिक अडचणी व निवडणूक आचारसंहिता या कारणांमुळे अर्ज भरण्यासाठी दोनदा मुदतवाढ देण्यात आली होती. दरम्यान आता या प्रकल्पाच्या घरांची सोडत उद्या म्हणजेच मंगळवारी दि. १० फेब्रुवारी रोजी होणार आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या सभागृहात उद्या १२ वाजता या सोडतीचा कार्यक्रम होणार आहे. 'म्हाडा'चे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल हे ऑनलाईन पद्धतीने या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

या प्रकल्पाच्या ४१८६ घरांसाठी एकूण २,५८,८३२ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यातील २,१५,९६५ अर्जदारांनी अनामत रकमेचा भरणा केलेला आहे. त्यांचा सोडतीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. पुणे मंडळाच्या या सोडतीला अर्जदारांनी भरघोस प्रतिसाद दिला आहे.या सोडतीला हजर राहण्याचे आवाहन पुणे म्हाडा मार्फत करण्यात आले आहे. मात्र ज्यांना अर्जदारांना सोडतीला येणं शक्य नाही, त्यांच्यासाठी मेसेजद्वारे एक लिंक पाठवली जाणार आहे. त्याद्वारे सोडत पाहू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गोरेगाव ड्रग रॅकेटचा पर्दाफाश! सत्तूच्या ड्रग साम्राज्यावर पालिकेचा बुलडोझर|VIDEO

Summer Saree Collection : ऑफिस असो वा पार्टी, उन्हाळ्यात दिसा कूल अन् स्टायलिश; एकदा 'या' ५ सुंदर साड्या ट्राय कराच

Heat Wave: नागरिकांनो सावधान! विदर्भात 8 दिवस उष्णलाटेचा इशारा; तापमानाचा पारा 45-46 अंशावर जाण्याची शक्यता

Maharashtra Heatwave: सूर्य कोपला; तुमच्या जिल्ह्याचं तापमान किती?

Maharashtra News Live Update: जालन्यात समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स बस आणि भंगार घेऊन जाणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात…

SCROLL FOR NEXT