Pune Metro Latest Update Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Metro: गुड न्यूज! पुणेकरांचा प्रवास आणखी सुखकारक होणार, स्वारगेटपर्यंतची मेट्रोसेवा गणेशोत्सवाआधीच सेवेत

Priya More

साागर आव्हाड, पुणे

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण पुणेकरांचा (Punekar) मेट्रोप्रवास आणखी सुखकारक होणार आहे. पुणे मेट्रोची (Pune Metro) स्वारगेटपर्यंत सेवा गणेशोत्सवाच्या आधी सुरू होण्याची शक्यता आहे. जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या भुयारी मेट्रो मार्गाचे काम ९५ टक्के पूर्ण झाले आहे. जुलै अखेरीस मेट्रोचे हे काम पूर्ण होणार आहे. त्यामुळे लवकरच जिल्हा न्यायालय ते स्वारगेट मार्गावर मेट्रो धावणार आहे.

पुणेकरांचा मेट्रोला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मेट्रो प्रशासनाकडून पुणेकरांसाठी नवनवीन सुविधा देखील देण्यात येत आहे. पुण्यामध्ये लवकरच भुयारी मेट्रो धावणार आहे. पुणे जिल्हा न्यायालय ते स्वारगेट दरम्यानचा मेट्रो मार्ग प्रवाशांसाठी खुला होणार आहे. त्यामुळे आता पुणेकरांचा मेट्रो प्रवास आणखी सुखकारक होणार आहे. सप्टेंबर महिन्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या आधी या मार्गावर मेट्रोसेवा सुरू करण्याचे महामेट्रोने नियोजन केले आहे.

पुणे जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या मार्गावर बुधवार पेठ, मंडई आणि स्वारगेट अशी तीन स्थानके आहेत. हा भूयारी मार्ग ३.६४ किलोमीटरचा आहे. या भुयारी मार्गावर मेट्रोची चाचणी फेब्रुवारीमध्ये घेण्यात आली. या चाचणीमध्ये मुठा नदीच्या पात्राखालून सुमारे १३ मीटरपर्यंत पहिल्यांदाच मेट्रो धावली होती. यातील जिल्हा न्यायालय स्थानक ते बुधवार पेठ स्थानक मार्ग मुठा नदीपात्राच्या खालून जातो. त्यामुळे शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा प्रकारे नदीपात्राखालून मेट्रो धावणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Live Updates : बूथ कमिटी बैठकीत भाजपा कार्यकर्त्यांमध्ये राडा , गोपीचंद पडळकर, तमनगौडा रवीपाटलांचे कार्यकर्ते भिडले

Bigg Boss Marathi Grand Finale: कोकण हार्टेड गर्ल बिग बॉसच्या घरातून बाहेर, प्रेक्षकांचे मानले आभार..

Chhagan Bhujbal : अजित पवार गटाचे बडे नेते पवार गटात जाणार; छगन भुजबळ यांनी सांगितलं विधानसभेत नेमकं गणित

SA vs IRE: दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का! तिसऱ्या वनडेतून स्टार खेळाडू बाहेर

Bigg Boss Marathi 5 च्या ग्रँड फिनालेला आर्याला नो एन्ट्री? काय आहे कारण? वाचा...

SCROLL FOR NEXT