pune metro to discontinue return journey ticket facility from 1 march  Saam TV
मुंबई/पुणे

Pune Metro : पुणे मेट्रोतून प्रवास करणा-यांसाठी महत्वाची बातमी, शुक्रवारपासून 'ही' सुविधा हाेणार बंद, नेटीझन्सच्या संमिश्र प्रतिक्रिया

काही प्रवाशांनी 'एक्स'वर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यापैकी काहींनी निर्णयाचे स्वागत केले आहे तर काहींनी हा निर्णय चुकीचा आहे असे म्हटले आहे.

Siddharth Latkar

- अक्षय बडवे

Pune News :

पुणे मेट्रोतून (pune metro latest marathi news) प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता परतीच्या प्रवासाचे तिकीट काढण्यासाठीची सुविधा बंद केली जाणार आहे. येत्या एक मार्च पासून प्रवाशांना परतीचे तिकीट (रिटर्न) काढता येणार नसल्याची घाेषणा मेट्राेने नुकतीच केली आहे. (Maharashtra News)

मेट्राेने पुणेकरांनी प्रवास करावा यासाठी आकर्षित याेजना सुरु केल्या. त्याला प्रवाशांनी उत्तम प्रतिसाद दिला. पुणे मेट्रोतून दरराेज प्रवास करणा-यांची संख्या देखील माेठी आहे. त्यामुळे मेट्राे सण, उत्सव काळात देखील प्रवाशांसाठी मेट्राेची वेळ वाढवून त्यांना सुविधा देते.

दरम्यान मेट्राे प्रवाशांना येत्या एक मार्च पासून प्रवाशांना परतीचे तिकीट (रिटर्न) काढता येणार नाही. त्याबाबत 'मेट्राे'ने एक्सवर पाेस्ट करुन (The Return Journey Ticket (RJT) facility will no longer be available starting 1st March 2024) नुकतीच घाेषणा केली आहे. परतीच्या तिकीटावरुन गोंधळ होत असल्याने आणि परतीचे तिकीट काढणा-यांची संख्या कमी असल्याने पुणे मेट्रोने हा महत्वाचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या निर्णयानंतर काही प्रवाशांनी 'एक्स'वर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यापैकी काहींनी निर्णयाचे स्वागत केले आहे तर काहींनी हा निर्णय चुकीचा आहे असे म्हटले आहे. एक प्रवासी लिहितात अत्यंत चुकीचा निर्णय आहे लोकांना उगाचच दोनदा लाईनीत उभे करण्यात काय आनंद मिळणार आहे ?

हा निर्णय याेग्य असल्याचे एका प्रवाशाने म्हटले आहे. ताे म्हणताे ही सेवा त्रासदायक हाेती.

काहींनी तर असली चींधीचोर्गिरी करण्यापेक्षा तुमचा खांबावर वाढदिवसा पासून ते दशक्रियाविधी पर्यंतचे फ्लेक्स लावणाऱ्या भाऊ/दादा/अण्णा/काका त्यांच्याकडून पैसे घ्या ना... पौड रोडवर तर तुमचा १५-२० खांबांवर अख्खा देखावा बनवला होता आणि गणपती गेल्यावर पण महिनाभर ठेवला होता... यातून निघाले असते पैसे ! असे म्हटले आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: कोल्हापुरात महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक ; उद्धव ठाकरेंनी दिला कानमंत्र

Shrirampur Vidhan Sabha : श्रीरामपूरमध्ये महायुतीचा पेच कायम; शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या उमेदवारांचे अर्ज कायम

Bus Accident : दोन बसचा समोरासमोर अपघात; २५ प्रवासी जखमी, कन्नड- चाळीसगाव बायपास रोडवरील घटना

Nashik News : दिवाळीनिमित्त परिवार बाहेरगावी; बांधकाम व्यवसायिकाच्या घरी २२ लाखांची चोरी

US Election : मतदानाआधी शेवटच्या रॅलीत डोनाल्ड ट्रम्प नाचले; माजी राष्ट्राध्यक्षांची तुलना, VIDEO

SCROLL FOR NEXT