Pune News Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Metro : पुणे मेट्रो सुसाट! २४ तासांत तब्बल ६ लाख जणांचा प्रवास, गणेशोत्सवात मेट्रोची कोट्यवधींची कमाई

Pune News : पुणे मेट्रोने गणेशोत्सव काळात विक्रमी प्रवास नोंदवला आहे. एका दिवसात ६ लाख तर दहा दिवसांत तब्बल ४० लाख प्रवाशांनी मेट्रोची निवड केली. मेट्रो प्रशासनाला ५ कोटींहून अधिक उत्पन्न मिळाले असून, पुणेकरांसाठी मेट्रो ‘लाईफलाईन’ ठरली आहे.

Alisha Khedekar

  • गणेशोत्सवात पुणे मेट्रोवर विक्रमी प्रवासी ओघ; एका दिवसात सहा लाख प्रवासी

  • दहा दिवसांत ४० लाख प्रवाशांनी मेट्रो प्रवास केला

  • मेट्रो प्रशासनाच्या तिजोरीत तब्बल ५.६६ कोटी रुपये जमा

  • महात्मा फुले मंडई स्थानक ठरले सर्वाधिक गजबजलेले

पुणेकरांच्या गणेशोत्सवात यंदा पुणे मेट्रोनेही वेगळाच ठसा उमटवला आहे. शहराच्या वाहतुकीतील प्रचंड गर्दी कमी करण्यासाठी सुरू झालेली मेट्रो सेवा आता पुणेकरांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनली असून, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तिचा वापर विक्रमी पातळीवर झाला आहे. एकाच दिवसात तब्बल सहा लाख प्रवाशांनी मेट्रोची निवड केली, तर दहा दिवसांच्या गणेशोत्सव काळात तब्बल चाळीस लाख पुणेकरांनी मेट्रोतून प्रवास करून नवा विक्रम रचला.

स्वारगेट ते पिंपरी चिंचवड आणि वनाज ते रामवाडी या दोन्ही मार्गांवर प्रवाशांचा ओघ इतका मोठा होता की, मेट्रो स्थानकं अक्षरशः गजबजून गेली होती. विशेष म्हणजे शहराच्या मध्यभागातील महात्मा फुले मंडई स्थानक हे सर्वाधिक लोकप्रिय ठरले. येथे तब्बल ६६ हजार ५४२ प्रवाशांनी प्रवास केला. डेक्कन जिमखाना स्थानकावर ६४ हजार ७०३, पिंपरी चिंचवड महापालिका स्थानकावर ४८ हजार ३६३, स्वारगेटवरून ४४ हजार ९१७ आणि पुणे महापालिका स्थानकावरून ३९ हजार २०८ प्रवाशांनी मेट्रोचा लाभ घेतला.

२७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर या १० दिवसांत दररोज लाखो प्रवासी मेट्रोतून प्रवास करत होते. २७ ऑगस्ट रोजी २ लाख २८ हजार प्रवासी होते, तर ३० ऑगस्ट रोजी हा आकडा ३ लाख ६८ हजारांवर पोहोचला. ४ सप्टेंबरला ३ लाख ९७ हजार आणि ६ सप्टेंबरला विक्रमी ५ लाख ९० हजार प्रवाशांनी मेट्रोचा वापर केला.

या दहा दिवसांत तब्बल ३९ लाख ६० हजार ९३७ प्रवाशांनी मेट्रोतून प्रवास केला असून, त्यातून ५ कोटी ६६ लाख ७१ हजार ६९१ रुपयांचे उत्पन्न मेट्रोच्या तिजोरीत जमा झाले आहे. गणेशोत्सवाच्या काळात मिळालेल्या या विक्रमी प्रतिसादामुळे मेट्रो प्रशासनालाही भविष्यातील नियोजनात मोठा आत्मविश्वास मिळाला आहे.

गणेशोत्सव हा पुण्याच्या सामाजिक-सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य भाग आहे. शहरातील प्रमुख गणेश मंडळांच्या दर्शनासाठी लाखो भाविक पुण्यात दाखल होतात. त्यामुळे रस्त्यांवर होणारी गर्दी, वाहतुकीतील कोंडी टाळण्यासाठी मेट्रो हा सुरक्षित आणि जलद पर्याय ठरला. पुणेकरांसह बाहेरून आलेल्या नागरिकांनीही मेट्रोच्या वेगवान सेवेचा लाभ घेतल्याचे दिसून आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Konkan Mhada House : म्हाडाच्या घरांसाठी अर्जांचा पाऊस; सानपाड्यातील २ घरांसाठी तब्बल ६१५६ अर्ज, प्राइम लोकेशन आहे तरी कुठं?

Gautam Patil : गौतमी पाटीलला अटक होणार? 'ते' प्रकरण अंगलट येणार, नेमकं काय घडलं होतं?

Maharashtra Politics: आता उद्धव ठाकरेंचं मिशन मराठवाडा, शेतकऱ्यांसाठी ठाकरे रस्त्यावर उतरणार?

Mumbai Crime: आरे कॉलनीत डान्सरवर बलात्कार; सराव करताना नृत्य प्रशिक्षकाची नियत फिरली, दारू पाजली नंतर...

Thane Crime : ठाण्यातील उपायुक्ताला २५ लाखांच्या लाचखोरीत अटक; आता फरार सुशांत अडकला

SCROLL FOR NEXT