Pune IT City Metro Region Limited CEO Anil Kumar Saini interacting with reporters regarding the upcoming launch of Pune Metro Line 3’s first phase connecting Hinjawadi to Baner. saam tv
मुंबई/पुणे

पुणेकरांसाठी गूड न्यूज! हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो 'या' तारखेला धावणार; सर्व पायलट असणार महिला

Hinjawadi To Shivajinagar Metro Station List And Route Map: हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो लाईन ३ चे काम अंतिम टप्प्यात आले असून १५ जुलैपर्यंत पहिल्या टप्प्यातील १२ मेट्रो स्टेशन प्रवासी वाहतुकीसाठी सुरू होणार आहेत.

Omkar Sonawane

गोपाल मोटघरे, साम टीव्ही

पुणे: आय टी पार्क हिंजवडी, मान आणि मारुंजीला जोडणारी बहुप्रतिक्षित मेट्रो लाईनचं 3 चे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात या मेट्रो लाईन वरील 23 पैकी 12 मेट्रो स्टेशन सुरू केले जाणार आणि उर्वरित 11 मेट्रो स्टेशन डिसेंबर पर्यंत टप्प्या - टप्प्याने सुरू केले जाणार अशी माहिती आज पुणे आयटी सिटी मेट्रो रिजन लिमिटेड तर्फे पत्रकार परिषदेत देण्यात आली.

शिवाजीनगर ते हिंजवडी अशा मेट्रो लाईन 3 चे काम मागील काही वर्षापासून सुरू आहे. शिवाजीनगर ते हिंजवडी अशी मेट्रो लाईन एकूण 23 किलोमीटर अंतराची असून या मेट्रो लाईन वर एकूण 23 स्टेशन असणार आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यात 12 मेट्रो स्टेशन सुरू करण्याचा निर्णय पुणे आयटी सीटी मेट्रो रिजन लिमिटेडने घेतला आहे. बाणेर येथील स्वर्गीय आर के लक्ष्मण म्युझियम ते हिंजवडी आणि मानपर्यंतचे 12 मेट्रो स्टेशन सुरुवातीच्या पहिल्या टप्प्यात सुरू केले जाणार आहे.

या 12 मेट्रो स्टेशनचे काम जवळपास अंतिम टप्प्यात आले असून 30 जूनपर्यंत या मेट्रो स्टेशनचे काम हे पूर्ण होणार आहे. मेट्रोचे काम पूर्ण झाल्यानंतर या मेट्रो मार्गाचे उद्घाटन करण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारशी संपर्क साधण्यात येईल आणि जवळपास 15 जुलैपर्यंत मेट्रो लाईन 3 वरील 12 स्टेशन हे सार्वजनिक वाहतुकीसाठी सुरू होतील असा अंदाज पुणे आयटी सिटी मेट्रो रिजन लिमिटेडचे सीईओ अनिल कुमार सैनी यांनी व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे या मेट्रो मार्गावरील सर्व मेट्रो रेल ड्रायव्हर ह्या महिला असणार आहेत. याच विषयी पुणे आयटीसीटी मेट्रो रिजन लिमिटेडचे सीईओ अनिल कुमार सैनी यांनी माहिती दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raksha Bandhan 2026 : 27 की 28 ऑगस्ट रक्षाबंधन कधी? जाणून घ्या योग्य तारीख आणि मुहूर्त

Property Rights: एखाद्या विधवेने मूल दत्तक घेतले, तर मुलाला पतीच्या मालमत्तेत हिस्सा मिळेल का? कायदा काय सांगतो?

Maharashtra News Live Update: बदलापुरात भूसंपादनाचा मोबदला लाटल्याचा धक्कादायक प्रकार

Maharashtra SIR Update : महाराष्ट्रातील २ कोटी मतदार वगळणार?

Mumbai : मुंबईत धावत्या लोकलवर दगडफेक; तरुणाचा व्हिडिओ व्हायरल, कठोर कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT