Buldhana : शिंदेंच्या शिवसेनेत जोरदार राडा, कॉलर पकडली अन् हाणामारी; संपर्क प्रमुखांसमोरच कांड, पाहा व्हिडिओ

Shinde Sena workers clash in Buldhana meeting : बुलढाण्यात शिंदे शिवसेनेच्या बैठकीदरम्यान दोन गटात जोरदार राडा झाल्याची घटना समोर आली आहे.

Shiv Sena faction fight Deulgaon Raja : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नवनियुक्त जिल्हा संपर्कप्रमुख संजय सोनार यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत शिवसैनिकांच्या दोन गटांत जोरदार राडा झाला. सुरुवातीला शाब्दिक चकमकीने सुरू झालेले हे प्रकरण थेट धक्काबुक्कीपर्यंत पोहोचले. या घटनेमुळे शिंदे यांच्या शिवसेनेत अंतर्गत गटबाजी आणि मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. देऊळगाव राजा येथे काल एका हॉटेलमध्ये शिवसेनेच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. नवनियुक्त जिल्हा संपर्कप्रमुख संजय सोनार यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडत होती. यावेळी माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांच्यासह इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

बैठक सुरू असतानाच, काही माजी पदाधिकाऱ्यांनी आपल्याला निमंत्रण नसल्याचा आरोप करत सभागृहात प्रवेश केला आणि जोरदार घोषणाबाजी सुरू केली. तसेच, नवनियुक्त संपर्कप्रमुख संजय सोनार यांचा सत्कार करण्यास काही पदाधिकाऱ्यांनी विरोध दर्शवला. यावरून दोन्ही गट आमनेसामने आले आणि त्यांच्यात बाचाबाची व धक्काबुक्की झाली. महत्त्वाची बाब म्हणजे, शिवसेनेच्या एका गटाने माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांच्या राजकीय कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने वातावरण अधिकच तापले. या संपूर्ण प्रकारामुळे जिल्हाभरात शिंदे यांच्या शिवसेनेत असलेल्या दोन गटांतील संघर्ष उघड झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com