Pune Metro Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Metro: पुणेकरांच्या कामाची बातमी! हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो या दिवशी सुरु होणार, तारीख आली समोर

Pune Metro Hinjewadi to Shivajinagar line Starting Date: हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो लवकरच सुरु होणार आहे. या मेट्रोचा पहिला टप्पा जूनच्या शेवटच्या आठवड्यात सुरु होणार आहे.

Siddhi Hande

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी

हिंजवडी शिवाजीनगर मेट्रो या दिवशी होणार सुरु

वाहतूक कोंडीपासून दिलासा मिळणार

मुंबईनंतर आता पुण्यातदेखील मेट्रोचे जाळे पसरत आहे. पुण्यात वेगवेगळ्या ठिकाणी मेट्रोचे काम सुरु आहे. पुण्यातील सर्वात महत्त्वाची मेट्रो म्हणजे हिंजवडी ते शिवाजीनगर. आता ही मेट्रोदेखील लवकरच सुरु होणार आहे.

शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रोचा पहिला टप्पा हा जून महिन्यात सुरु होऊ शकतो. जूनच्या शेवटच्या आठवड्यात मेट्रो सेवा सुरु होऊ शकते. दरम्यान, आता सध्या मेट्रोची सुरक्षा तपासणी सुरु आहे, असं अधिकाऱ्यांनी सांगितले. सर्व सुरक्षा मंजुरी मिळाल्यानंतर पहिला टप्पा जून अखेरपर्यंत सुरु केला जाऊ शकतो.

पहिल्या टप्प्यात १२ स्थानके

मेट्रोच्या पहिल्या टप्प्यात १२ स्थानकांचा समावेश आहे. मान ते बालेवाडी अशी ही मेट्रो सुरु होणार आहे. यामुळे या भागातील प्रवाशांचा प्रवास सोपा होणार आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संपूर्ण हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गावर चाचणी फेऱ्या यशस्वीरित्या पूर्ण झाल्या आहेत. मेट्रो सुरु करण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल आहे. शिवाजीनगरजवळील उर्वरित ११ स्थानकांचे काम सुरु आहे. तांत्रिक अडचणींमुळे कामाला विलंब होऊ शकतो. ही स्थानके ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

प्रवाशांना होणार फायदा

मेट्रोच्या पहिल्या टप्प्यामुळे बालेवाडीतील प्रवाशांना फायदा होण्याची अपेक्षा आहे.मेट्रोचा पूर्ण फायदा शिवाजीनगरचा टप्पा पूर्ण झाल्यानंतरच होईल.अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बाणेर आणि शिवाजीनगरमधील चार स्थानकांमध्ये तांत्रिक अडचणी येत आहेत. त्यामुळे संपूर्ण कॉरिडोरचे काम मंदावले आहे.मात्र, ही मेट्रो सुरु झाल्यानंतर अनेकांना फायदा होणार आहे. हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो सुरु झाल्यानंतर या परिसरात काम करणाऱ्या आयटी कर्मचाऱ्यांना खूप फायदा होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अबब! मुंबईच्या वरळीत फ्लॅटचं भाडं तब्बल 18 कोटी, VIDEO

कांदा उत्पादक पेटला, महामार्ग रोखला, कांद्याच्या हमीभावासाठी शेतकरी रस्त्यावर

मोठी बातमी! महायुतीतील बंडखोर माजी आमदाराचा उमेदवारी अर्ज बाद

पश्चिम बंगालमध्ये महाराष्ट्र पॅटर्न? ठाकरे-पवारांसारखा ममतांचाही पक्ष फुटणार? तृणमूलचे 50 आमदार बंडखोरीच्या तयारीत?

पुण्यात रक्तरंजित थरार; चारित्र्याच्या संशयातून 'लिव्ह-इन'मधील तरुणीला निर्घृणपणे संपवलं

SCROLL FOR NEXT