Pune : पुणे मेट्रोत निष्काळजीपणा, शिवाजीनगर-स्वारगेट मेट्रो बोगद्यात भगदाड, बोरवेलमुळे पाण्याची गळती

Pune Metro News : पुण्यातील मेट्रो बोगद्यात बेकायदेशीर बोरवेलमुळे भगदाड पडून पाण्याची गळती सुरू झाली होती. संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
Pune : पुणे मेट्रोत निष्काळजीपणा, शिवाजीनगर-स्वारगेट मेट्रो बोगद्यात भगदाड, बोरवेलमुळे पाण्याची गळती
Pune Metro Tunnel Leakeges By Illegal Borewell DrillingSaam Tv
Published On
Summary
  • पुणे मेट्रो बोगद्यात भगदाड पडून पाण्याची गळती

  • बेकायदेशीर बोरवेलमुळे घटना घडली

  • तातडीने दुरुस्ती

  • संबंधितांवर गुन्हा दाखल

  • मेट्रो सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण

Pune Metro Tunnel Leakeges By Illegal Borewell Drilling पुण्यातील मेट्रो प्रकल्पाला मोठा धोका निर्माण करणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. बोरवेल पाडताना शिवाजीनगर ते स्वारगेट दरम्यानच्या भूमिगत मेट्रो बोगद्यात भगदाड पडून पाण्याची गळती सुरू झाली होती. वेळेत उपाययोजना करुन भगदाड बुजवण्यात आला आहे, तर या गंभीर प्रकरणात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.

शिवाजीनगर ते स्वारगेट या भुयारी मेट्रो मार्गात १४ मार्च रोजी बोगद्यात पाण्याची गळती असल्याचे मेट्रो ऑपरेटरच्या निदर्शनासाठी त्याचा दरम्यान वॉटर अलर्ट ही मेट्रो सिस्टीमवर दिसू लागला. मेट्रो अधिकाऱ्यांनी संपूर्ण बोगद्याची पाहणी केली.

Pune : पुणे मेट्रोत निष्काळजीपणा, शिवाजीनगर-स्वारगेट मेट्रो बोगद्यात भगदाड, बोरवेलमुळे पाण्याची गळती
Political News : आधी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, आता पोलिसांकडून अटक; बड्या नेत्याला बेड्या ठोकल्याने राजकीय वर्तुळात खळबळ

या पाहणी दरम्यान शुक्रवार पेठ परिसरातून बोरवेलमुळे बोगद्याच्या सिमेंट रिंगला सुमारे ६ इंचाचे छिद्र पडून पाणी झिरपत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले. तातडीने मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी बोरवेलचे छिद्र पूर्णपणे केमिकल आणि काँक्रीटने बुजवले आहे.

Pune : पुणे मेट्रोत निष्काळजीपणा, शिवाजीनगर-स्वारगेट मेट्रो बोगद्यात भगदाड, बोरवेलमुळे पाण्याची गळती
Shocking : भाजप नेत्याच्या मुलाचे सेक्स स्कँडल उघड; २५ हून अधिक मुलींचे शोषण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

जागा मालक धनंजय मोटे आणि ठेकेदार जगताप यांच्यावर गुन्हा दाखल खडक पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला आहे. तर असे प्रकार होऊनही यासाठी सूचनाफलक आणि मार्किंग ही करण्यात येणार आहे. घटनेचं गांभीर्य पाहून मेट्रो विभागाकडून तात्काळ बेकायदेशीर बोरवेल काढणाऱ्यांवर तक्रार देऊन कारवाई करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com