Pune Manglwar Peth Crime News  Saam Tv
मुंबई/पुणे

Pune : शौचालयाला जाणाऱ्या महिलेची काढली छेड, जाब विचारायला गेलेल्या पतीला बेदम मारहाण; पुण्यातील धक्कादायक घटना

Pune Manglwar Peth Crime News : पुण्यातील मंगळवार पेठेत पत्नीची छेडछाड केल्याचा जाब विचारणाऱ्या पतीवर बांबूने हल्ला करण्यात आला. या प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Alisha Khedekar

  • पुण्यात छेडछाड प्रकरणातून मारहाणीची घटना

  • जाब विचारणाऱ्या पतीवर बांबूने हल्ला

  • तिघांविरोधात गुन्हा दाखल

  • जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू

सागर आव्हाड, पुणे

पुण्यात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काढल्याचा जाब विचारायला गेलेल्या पतीला बांबूने जबर मारहाण करण्यात आली आहे. पुण्यातील मंगळवार पेठेतील भीमगर परिसरात ही घटना घडली असून, या प्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या गडीतळ पोलीस चौकीत तक्रार करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अखिल अयुब पठाण (वय ३३) हे मंगळवार पेठेत आपल्या कुटुंबासह राहतात. १४ एप्रिल रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास त्यांची पत्नी सार्वजनिक शौचालयात जात असताना, परिसरातील आदित्य प्रशांत काकडे (वय २७) याने त्यांची छेडछाड करण्याचा प्रयत्न केला. घाबरलेल्या पत्नीने घरी येऊन हा प्रकार पतीला सांगितला.

अखिल पठाण यांनी संतापाच्या भरात या प्रकाराचा जाब विचारण्यासाठी आदित्यकडे गेले. यावेळी दोघे आमनेसामने आल्याने दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. रागाच्या भरात आदित्यने जवळ असलेला बांबू अखिल यांच्या डोक्यात मारून त्यांना जखमी केले. यावेळी आदित्यचा लहान भाऊ हर्षवर्धन काकडे आणि त्यांच्या मामाचा मुलगा पवार यांनीही पठाण यांना शिवीगाळ करत मारहाण केली.

या मारहाणीत पठाण गंभीर जखमी झाले. घटनेनंतर अखिल पठाण आणि त्यांच्या भावाने तात्काळ गडीतळ पोलीस चौकी गाठून मारहाण करणाऱ्या तरुणांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून जखमी अखिल यांना उपचारासाठी ससून रुग्णालयात पाठवले आणि त्यांची वैद्यकीय तपासणी केली. तसेच संबंधित मारेकऱ्यांवर छेडछाड प्रकरणी, तसेच मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल केला. दिवसाढवळ्या झालेल्या या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते.

मंगळवार पेठेत सुरक्षा भिंत कोसळली

पुण्यातील मंगळवार पेठेतील सुशीला सोसायटी येथे आज सकाळी ६.५७ च्या सुमारास सीमा भिंतीचा काही भाग अचानक कोसळला. ही भिंत खाली उभ्या असलेल्या दोन रिक्षांवर पडल्याने रिक्षांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या अपघाताच्या वेळी तिथे कोणीही नसल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेची माहिती मिळताच कसबा अग्निशमन केंद्रातील रात्रपाळीतील पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अडकलेल्या दोन्ही रिक्षा सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आल्या असून, प्रशासनाने पुढील खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Female Behaviour After Breakup: सोशल मीडिया 'स्टॉकिंग' ते शॉपिंग; ब्रेकअपनंतर मुली नेमकं काय काय करतात?

Maharashtra News Live Update: “नाव सेवाग्राम पण थांबा नाही”; खासदार अमर काळे यांच्याकडून खंत व्यक्त

Nagpur Summer Tourism: नागपूरजवळची 'ही' थंड हवेची ठिकाणं माहितीयेत का? उन्हाळ्याच्या सुट्टीत एकदा पाहाच...

काँग्रेसची मोठी कारवाई, ५ आमदार तडकाफडकी निलंबित; राजकीय वर्तुळात खळबळ

Pune News: वीजपुरवठा खंडित झाला, भाजपचे नगरसेवक महावितरण कार्यालयात जाऊन झोपले; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT