Hair Care: केसात खूप कोंडा झालाय? केस खूप गळतायत? मग रोज रात्री झोपण्यापूर्वी केसांवर हा स्प्रे नक्की लावा

Shruti Vilas Kadam

केसांच्या वाढीसाठी महत्वाचे

तांदळाच्या पाण्यातील अमिनो ॲसिड्स, मेथीतील प्रथिने आणि कलौंजीतील पोषक घटक केसांच्या वाढीस मदत करू शकतात.

Hair Care | Saam Tv

केस गळती कमी होण्यास मदत

मेथी दाणे आणि कडिपत्त्यातील पोषक तत्त्वे केसांच्या मुळांना बळकटी देऊन केस गळती कमी करण्यास सहाय्य करू शकतात.

Hair Care | Saam tv

टाळूचे आरोग्य सुधारते

काळे तीळ आणि कडिपत्त्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स व दाहशामक गुणधर्म असतात, जे टाळू निरोगी ठेवण्यास मदत करतात.

Hair Care | Saam Tv

केसांना नैसर्गिक चमक मिळते

तांदळाचे पाणी केसांच्या क्युटिकल्सना गुळगुळीत बनवून केस अधिक चमकदार आणि मऊ दिसण्यास मदत करू शकते.

Hair Care | Saam tv

कोंडा कमी करण्यास उपयुक्त

या मिश्रणातील घटक टाळूवरील कोरडेपणा आणि कोंडा कमी करण्यास मदत करू शकतात, त्यामुळे खाज सुटण्याची समस्या कमी होऊ शकते.

Hair Care:

हेअर स्प्रे कसा तयार करावा?

१ चमचा तांदळाचे पाणी, १ चमचा मेथी दाणे, १ चमचा काळे तीळ आणि ८ ते १० कडिपत्त्याची पाने पाण्यात उकळा. मिश्रण थंड झाल्यावर गाळून स्प्रे बाटलीत भरून ठेवा.

Hair Care | Saam Tv

वापरण्याची योग्य पद्धत

हा स्प्रे टाळू आणि केसांच्या मुळांवर फवारावा. ३० ते ४५ मिनिटे तसेच ठेवून नंतर सौम्य शॅम्पूने केस धुवावेत. आठवड्यातून २ ते ३ वेळा वापर केल्यास चांगले परिणाम दिसू शकतात.

Hair Care | Saam tv

Face Care: क्लिन आणि सॉफ्ट स्किनसाठी पार्लर ट्रेटमेंटची काय गरज? घरीच हा फेसमास्क करेल सगळे पॉब्लेम दूर

Face Care | Saam Tv
येथे क्लिक करा