Shruti Vilas Kadam
गुळामध्ये नैसर्गिक एक्सफोलिएटिंग गुणधर्म असतात, तर लिंबू त्वचेवरील मृत पेशी काढून त्वचा तजेलदार बनवण्यास मदत करतो.
लिंबूमधील व्हिटॅमिन सी आणि गुळातील पोषक घटक त्वचेची चमक वाढवून चेहरा अधिक उजळ दिसण्यास मदत करतात.
सूर्यप्रकाशामुळे झालेली टॅनिंग कमी करण्यासाठी लिंबू आणि गुळाचा फेसमास्क फायदेशीर ठरू शकतो.
लिंबू त्वचेतील अतिरिक्त तेल कमी करण्यास मदत करतो, त्यामुळे त्वचा अधिक स्वच्छ आणि ताजीतवानी दिसते.
गुळामध्ये असलेले खनिज घटक त्वचेचा कोरडेपणा कमी करून तिला मऊ आणि निरोगी ठेवण्यास मदत करतात.
एक चमचा गूळ बारीक करून त्यात काही थेंब लिंबाचा रस मिसळा. तयार मिश्रण चेहऱ्यावर 10-15 मिनिटे लावून कोमट पाण्याने धुवा.
संवेदनशील त्वचा असल्यास लिंबू त्वचेला त्रास देऊ शकतो. त्यामुळे प्रथम पॅच टेस्ट करा आणि जळजळ झाल्यास वापर थांबवा.