Shruti Vilas Kadam
विजय देवरकोंडा अलीकडे एका कार्यक्रमात दिसला. यावेळी त्याच्या गळ्यातील खास पेंडंटने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले.
विजयच्या पेंडंटवर ‘R’ हे अक्षर लिहिले होते. त्यामुळे हे अक्षर रश्मिका मंदानाच्या नावाशी जोडले जात आहे.
सोशल मिडियावर एका चाहत्याने कमेंट केली, "हे तर भाऊचे मंगळसूत्र आहे!" दरम्यान, दुसऱ्या एका चाहत्याने कमेंट केली, 'R म्हणजे रश्मिका'
रश्मिका आणि विजय यांनी २६-२०२६ रोजी जयपूरमध्ये थाटामाटात लग्न केले. त्यांनी खासगी पद्धतीने लग्न केले.
विजय आणि रश्मिका यांची जोडी प्रथम गीता गोविंदम् मध्ये झळकली होती. त्यानंतर डियर कॉम्रेड मध्येही दोघांनी एकत्र काम केले आणि चाहत्यांची पसंती मिळवली.
विजय आणि रश्मिका आता रणबली या आगामी चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. ११ सप्टेंबरला प्रदर्शित होणारा हा चित्रपट ऐतिहासिक घटनांवर आधारित असल्याचे सांगितले जात आहे.