Tips for Comfortable Sleep: रात्री पटकन झोप येत नाही? डॉक्टरांनी सांगितले रात्री पटकन झोप लागण्यासाठीचे ७ बेस्ट टिप्स

Shruti Vilas Kadam

झोपण्यापूर्वी दीर्घ श्वसनाचा सराव करा

रात्री झोपण्यापूर्वी ५ ते १० मिनिटे दीर्घ श्वसनाचे व्यायाम केल्याने मन शांत होते आणि शरीराला विश्रांती मिळते.

Sleep | pinterest

दीर्घ श्वसन ही नैसर्गिक निद्रा उपचार पद्धत

अनेक डॉक्टर दीर्घ श्वसन हा नैसर्गिक झोपेचा उपाय आहे हे सांगतात. यामुळे तणाव कमी होऊन झोप लवकर लागण्यास मदत होते.

Sleep problems | GOOGLE

संध्याकाळनंतर चहा-कॉफीचे सेवन टाळा

चहा आणि कॉफीमधील कॅफिन मेंदूला सक्रिय ठेवते. त्यामुळे रात्री झोप नीट येत नाही.

sleep | canva

रात्री हलके जेवण करण्यावर भर द्या

झोपण्यापूर्वी जड अन्न खाल्ल्यास पचनावर ताण येतो. हलके आणि संतुलित जेवण घेतल्यास झोप अधिक आरामदायी होते.

sleep

खोलीतील प्रकाश आणि आवाज कमी ठेवा

झोपताना खोलीतील दिवे मंद ठेवावेत आणि गोंगाट टाळावा. शांत वातावरणामुळे शरीर झोपेसाठी अधिक तयार होते.

Night Habits

दररोज एकाच वेळी झोपण्याची सवय लावा

नियमित झोपेची वेळ ठेवल्याने शरीराचे रुटीन संतुलित राहते आणि झोपेची गुणवत्ता सुधारते.

sleep

उत्तम झोप मानसिक व शारीरिक आरोग्यासाठी आवश्यक

पुरेशी आणि चांगली झोप घेतल्याने थकवा कमी होतो, मन प्रसन्न राहते आणि एकूण आरोग्य सुधारण्यास मदत मिळते.

Good Sleep | GOOGLE

Shahi paneer Recipe: घरच्या घरी बनवा स्वादिष्ट शाही पनीर; पाहुण्यांनाही आवडेल खास रेसिपी

Shahi paneer Recipe | Pintrest
येथे क्लिक करा