Shahi paneer Recipe: घरच्या घरी बनवा स्वादिष्ट शाही पनीर; पाहुण्यांनाही आवडेल खास रेसिपी

Shruti Vilas Kadam

शाही पनीरसाठी लागणारे साहित्य

पनीर, कांदा, टोमॅटो, काजू, ताजी क्रीम, आले-लसूण पेस्ट, तिखट, गरम मसाला, बटर आणि कसुरी मेथी हे मुख्य साहित्य लागते.

Shahi paneer Recipe | Pinterst

काजूची पेस्ट तयार करा

काजू गरम पाण्यात भिजवून त्याची मऊ पेस्ट तयार करा. यामुळे ग्रेव्हीला रिच आणि क्रीमी चव मिळते.

Paneer Masala Recipe

कांदा-टोमॅटो मसाला परतून घ्या

बटरमध्ये कांदा, टोमॅटो आणि आले-लसूण पेस्ट चांगली परतून घ्या. त्यानंतर हा मसाला थंड करून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.

Paneer Masala Recipe

ग्रेव्हीला द्या शाही स्वाद

तयार मसाल्यात काजूची पेस्ट, लाल तिखट, गरम मसाला आणि मीठ घालून मंद आचेवर शिजवा. त्यामुळे ग्रेव्ही अधिक चविष्ट होते.

Shahi paneer Recipe | Saam tv

पनीर हलक्या हाताने मिसळा

पनीरचे चौकोनी तुकडे करून ग्रेव्हीत घाला. पनीर जास्त हलवू नका, अन्यथा ते तुटू शकते.

Shahi paneer Recipe

क्रीम आणि कसुरी मेथीने वाढवा चव

शेवटी ताजी क्रीम आणि कसुरी मेथी घातल्याने शाही पनीरला रेस्टॉरंटसारखी चव आणि सुगंध मिळतो.

Shahi paneer Recipe | Saam Tv

नान किंवा पराठ्यासोबत सर्व्ह करा

गरमागरम शाही पनीर बटर नान, रोटी किंवा पराठ्यासोबत सर्व्ह करा. खास प्रसंगी ही डिश पाहुण्यांची मनं जिंकते.

Shahi paneer Recipe | Saam Tv

Birds Predict Monsoon: चातकचं नव्हे आपल्या आजूबाजूला असणारे हे पक्षी देतात पावसाची चाहूल, कसं जाणून घ्याल

Birds Predict Monsoon | Pintrest
येथे क्लिक करा