Pune Double Decker Flyover News  Saam Tv
मुंबई/पुणे

Pune : पुणेकरांसाठी खुशखबर! आणखी एक डबल डेकर उड्डाणपूल होणार, मुंढवा-खराडी ट्रॅफिकची कटकट संपणार

Pune Double Decker Flyover News : पुण्यातील मुंढवा-केशवनगर-खराडी मार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महात्मा फुले चौकात डबल डेकर उड्डाणपूल उभारण्याच्या प्रकल्पाला मंजुरी मिळाली आहे. प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Alisha Khedekar

  • मुंढवा-खराडी मार्गावर दुमजली उड्डाणपूल मंजूर

  • १२६ कोटींचा प्रकल्प

  • वाहतूक कोंडी कमी होणार

  • २४ महिन्यांत काम पूर्ण होणार

Pune Double Decker Flyover News पुण्यात ८ मार्च रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील बहुप्रतीक्षित एकात्मिक दुमजली उड्डाणपुल सुरु करण्यात आला. त्यानंतर आता मुंढवा, केशवनगर ते खराडी बायपास या रस्त्यावरील महात्मा फुले चौकात दुमजली उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. या प्रक्रल्पामुळे अत्यंत वर्दळीच्या व सतत वाहतूक कोंडी होणाऱ्या या रस्त्यावरील ये जा करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

या दुपदरी उड्डाणपुलाच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मंगळवारी मान्यता दिल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी पत्रकार परिषदेत दिली. या पुलामुळे मुंढवा, केशवनगर, खराडी बायपास परिसरातील सततची कोंडी दूर होणार आहे. तसेच प्रवाशांचा प्रवास देखील वेगाने होणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकल्पांचे बांधकाम लवकर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार पावसाळ्याचा कालावधी वगळून २४ महिन्यांत हे काम पूर्ण केले जाणार असल्याचे स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले पत्रकार परिषदेत म्हणाले. पुण्यात मेट्रोचं जाळ अधिक विस्तृत होत आहे. अशातच मेट्रोला पुणेकरांची पसंती मिळत असून, मेट्रोच्या विस्तारित मार्गिकांनाही आता मान्यता देण्यात आली आहे.

मुंढवा, केशवनगर ते खराडी मार्गावरही मेट्रो प्रस्तावित आहे. त्यामुळे महामेट्रोशी चर्चा करून या पुलात मेट्रोचाही अंतर्भाव केल्याचे भिमाले पत्रकार परिषदेत म्हटलं. उड्डाणपुलाचा खर्च, वस्तू व सेवा कर, रॉयल्टी फी व गुणवत्ता तपासणी आदीसह तडजोडीने १२६ कोटी ६३ लाख ३६,१०३ रुपयांच्या निविदेला मान्यता देण्यात आली आहे. नळस्टॉप येथील पुलाच्या धर्तीवर हा एकात्मिक दुमजली उड्डाणपूल असेल. पहिल्या स्तरावरून वाहने, तर दुसऱ्या स्तरावरून मेट्रो धावेल, असे प्रकल्प विभागप्रमुख दिनकर गोजारे यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vande Bharat Train: पुणेकरांसाठी गुड न्यूज! १९ तासांचा प्रवास फक्त १३ तासांवर; पुणे-बंगळुरू वंदे भारत स्लीपर एक्स्प्रेस धावणार

CMRF Maharashtra: मुख्यमंत्री सहाय्यता निधीत मोठा डिजिटल बदल; रुग्णांना ८ तासांत मदतीचा निर्णय

Maharashtra News Live Update: जळगाव जिल्ह्यात शासकीय विश्रामगृह परिसरात बिबट्या शिरला

Face Care: सॉफ्ट ग्लोईंग आणि मॉइश्चराइज स्किनसाठी संध्याकाळी १० मिनिटांसाठी लावा ही घरगुती पेस्ट

विकासाच्या वेगात पर्यावरणाचा बळी? राज्यातील आणखी एका जिल्ह्यात १०० वर्षे जुन्या झाडांवर कुऱ्हाड

SCROLL FOR NEXT