Mardani Khel in Germany X
मुंबई/पुणे

Pune : महाराष्ट्राचा मर्दानी खेळ थेट जर्मनीमध्ये! पुण्यात प्रशिक्षण घेत परदेशी तरुणीने सुरू केले वर्ग

Pune City : महाराष्ट्राची ओळख असलेला मर्दानी खेळ सातासमुद्रापार गेला आहे. एका जर्मन तरुणीने पुण्यात मर्दानी खेळ शिकून जर्मनीमध्ये या युद्धकलेचे प्रशिक्षण वर्ग सुरु केले आहेत.

Yash Shirke

  • जर्मन तरुणीने पुण्यात मर्दानी खेळ शिकून जर्मनीत अधिकृत प्रशिक्षण वर्ग सुरू केला.

  • लटोया वाईल्डला मर्दानी खेळाची आवड निर्माण होऊन ती पुण्यात प्रशिक्षणासाठी आली होती.

  • श्री शिवाजीराजे मर्दानी आखाड्याच्या सहकार्याने भारताबाहेरील पहिली अधिकृत शाखा जर्मनीत सुरू झाली.

अक्षय बडवे, साम टीव्ही, प्रतिनिधी

Pune News : महाराष्ट्राचा अभिमान असलेल्या मर्दानी खेळाने आता आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडल्या आहेत. ऐतिहासिक महत्त्व असलेली ही युद्धकला थेट जर्मनीपर्यंत पोहोचली आहे. पुण्यातील छत्रपती शिवाजीनगर गावठाण येथील श्री शिवाजीराजे मर्दानी आखाडा येथे प्रशिक्षण घेतल्यानंतर जर्मन तरुणीने जर्मनीमध्ये मर्दानी खेळाचे वर्ग सुरु केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जर्मन तरुणी लटोया वाईल्डला महाराष्ट्रातील मर्दानी खेळाची प्रचंड आवड निर्माण झाली होती. लटोया ही प्रथम पुण्यात येऊन मर्दानी खेळाचे प्रशिक्षण घेतले. ती गणपती आगमन आणि विसर्जन मिरवणुकीतही सहभागी झाली होती. पुण्याहून जर्मनीला परतल्यानंतर लटोयाने ऑनलाइन माध्यमातून आखाड्यासोबत सराव सुरु ठेवला.

लटोया वाईल्डच्या या आवडीमुळेच तिच्या जर्मनीमध्ये शिवजयंती उत्सव आणि छावा चित्रपटाच्या प्रीमियरच्या वेळी लटोया वाईल्डने मर्दानी खेळाची थरारक प्रात्यक्षिके सादर केली होती. याला जर्मनीमधील नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला होती. तेथील काही स्थानिक नागरिकांनी मर्दानी खेळ शिकण्याची लटोयाकडे मागणी केली होती.

स्थानिक नागरिकांच्या मर्दानी खेळ शिकण्याच्या मागणीवरुन लटोया वाईल्डने पुण्यातील श्री शिवाजीराजे मर्दानी आखाडा यांच्या सहकार्याने जर्मनीत अधिकृत मर्दानी खेळ प्रशिक्षण वर्ग सुरू केला आहे. यामुळे मर्दानी खेळाचा प्रचार व प्रसार भारताबाहेरच्या पहिल्या शाखेद्वारे अधिकृतपणे सुरू झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी, बांगलादेशाने आयात बंदी हटवली

Banana Mask: केसांच्या वाढीसाठी 'असा' करा केळीच्या सालीचा वापर, वाचा हेअर मास्क बनवण्याची सोपी पद्धत

Voter List Scam : हा तर मोठा घोटाळा! मतदार यादीत एकाच महिलेचं ६३ वेळा नाव; कुठे झाला घोळ?

Mumbai Dabbawala: डबेवाल्यांना मुंबईत मिळणार ५०० स्क्वेअर फुटाचं घर

Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी सैनिकांना सन्मान, १६ बीएसएफ जवांनाना शौर्य पुरस्कार प्रदान

SCROLL FOR NEXT