Pune News Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Porsche Case : पुण्यातील पोर्शे प्रकरणातील अग्रवाल कुटुंब पुन्हा चर्चेत, सील केलेलं हॉटेल पुन्हा मिळालं

Pune News : पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरणातील विशाल अग्रवाल यांच्या महाबळेश्वर येथील MPG Club हॉटेलबाबत नवे वाद निर्माण झाले आहेत. प्रशासनाने गुप्त आदेशाद्वारे सील केलेले हे पंचतारांकित हॉटेल पुन्हा अग्रवाल कुटुंबाच्या ताब्यात दिल्याची माहिती समोर आली आहे.

Alisha Khedekar

  • पोर्शे प्रकरणातील विशाल अग्रवाल यांच्या महाबळेश्वर MPG Club हॉटेलवरून पुन्हा वाद पेटला आहे.

  • एक वर्षांपूर्वी सील केलेलं हे हॉटेल सातारा प्रशासनाने गुप्त आदेशाद्वारे पुन्हा ताब्यात दिलं आहे.

  • आदेशात वाणिज्य वापर थांबवण्याचे निर्देश दिले असले तरी राजकीय दबावाच्या चर्चेला उधाण आलं आहे.

  • सरकारी जागेचा वापर आणि लीज प्रॉपर्टीच्या वैधतेबाबत चौकशीची मागणी वाढली आहे.

पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणातील विशाल अग्रवाल यांचे महाबळेश्वर कनेक्शन समोर आल्यानंतर त्यांचं MPG club हे पंचतारांकित हॉटेल महाबळेश्वर मध्ये अनाधिकृत पद्धतीने उभ असल्याचं समोर आलं होतं. यानंतर खडबडून जागं होत प्रशासनाने कारवाई केली होती. शासकीय मिळकतीमध्ये तीस वर्षाच्या भाडेपट्ट्यानं रहिवास वापराकरता घेतलेल्या जागेमध्ये पांचतारंकित उभ असलेलं हे MPG club हॉटेल सील करत अनधिकृत पद्धतीने केलेलं बांधकाम पाडून या हॉटेलमधला बार सुद्धा सील केला होता.याला जवळपास एक वर्ष उलटून गेल आहे. मात्र सातारा जिल्हा प्रशासनान अगदी गुप्त पद्धतीने आदेश काढत हे हॉटेल पुन्हा अग्रवाल कुटुंबाच्या ताब्यात दिल आहे.

शासकीय मिळकतीमध्ये भाडेपट्ट्याने असलेली या अग्रवाल कुटुंबाची जागा पुन्हा शासनाने माघारी घ्यावी अशी मागणी तेव्हापासून होत होती. सर्व नियम धाब्यावर बसवून प्रशासनाची फसवणूक करत उभारलेल्या या हॉटेलचं सील काढून ते पुन्हा अग्रवाल कुटुंबालाच का देण्यात आलं? याबाबत उलट सुलट चर्चा सध्या सुरू झालेली आहे.मोठा राजकीय दबाव जिल्हा प्रशासनावर होता असं सुद्धा बोलले जातं आहे. जर राजकीय दबाव होता तर कोणत्या नेत्याचा होता? हे सुद्धा समोर यावं असं लोकांचं म्हणणं आहे.

सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी या हॉटेलचे सील उघडण्याच्या आदेश दिले आहेत. यामध्ये या प्रॉपर्टी मधला वाणिज्य वापर तात्काळ बंद करावा आणि मिळकतीचा वापर केवळ मूळ जिमखाना या प्रयोजनासाठीच करावा असं या आदेशात म्हटल आहे. मात्र दुसऱ्या बाजूला वादींना वापरात बदल करायचा असल्यास त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या संबंधित विभागांची परवानगी घेणे बंधनकारक असल्याचे सुद्धा यात म्हटलं आहे.

यामुळे यामध्ये पुढील काही काळात अग्रवाल कुटुंबाला ३० वर्ष भाडेतत्वावर शासकीय जागेवर वाणिज्य वापर करेल का? याबाबत शंका व्यक्त केली जाते आहे. महाबळेश्वर मधील शासकीय जागेत चुकीच्या नियमबाह्य पद्धतीने चालेल्या कामामुळे लिज प्रॉपर्टीची मागणी पाहणी करण्याची सुद्धा मागणी होताना पाहायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजप खासदाराच्या समर्थकांकडून आचारसंहितेचा भंग, नांदेडमध्ये नेमकं काय घडलं?

Leopard Terror: हिंगोलीत बिबट्यामुळे चक्काजाम; शेतकऱ्यांची कामे बंद, विद्यार्थ्यांना सुट्ट्या

EPFO PF Transfer: नोकरी बदलली तरी PF ट्रान्सफर होणार विना टेन्शन; फक्त ५ दिवसांत होणार प्रक्रिया पूर्ण

Tuesday Horoscope : खर्चाला गळतीच राहील; ५ राशींच्या लोकांना चोरीपासून सावध राहावे लागेल

बंडखोरी रोखण्यासाठी भाजपचा नवा फॉम्युला, इच्छुकांची भाऊगर्दी, मतदारांच्या दारोदारी

SCROLL FOR NEXT