दिलीप कांबळे, साम टीव्ही प्रतिनिधी
लोणावळा परिसरातील अतिशय दुर्गम भाग असलेल्या आदिवासी पाड्यावर तब्बल चाळीस वर्षांनंतर वीज पोहचली आहे. जवळपास ४० वर्षे हे गाव अंधारात होते. ४० वर्षानंतर आदिवासी पाड्यावर वीज सुरू झाल्याने ग्रामस्थांच्या आनंदाला उधाण आले आहे. या गावातील पस्तीस कुटुंबीयांचे स्वप्न अखेर पूर्ण झाले असून, अंधारातून प्रकाशाकडे झालेल्या या प्रवासाचा साक्षीदार आज संपूर्ण गाव आहे.
गेल्या चार दशकांपासून ग्रामस्थांकडून वीजपुरवठ्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू होता. मात्र DPPC मधून अनुदान उपलब्ध न झाल्याने या कामाला वारंवार विलंब होत होता. अखेर या कामासाठी नवीन 58 विद्युत वाहक पोल्सना मंजुरी मिळाली आणि प्रत्यक्ष कामाला गती मिळाली.आमदार सुनिल शेळके यांनी पुढाकार घेत आवश्यक अनुदान उपलब्ध करून दिल्यामुळे हा प्रश्न मार्गी लागला. त्यांच्या प्रयत्नांमुळेच वेताळनगरमध्ये वीज पोहोचू शकली, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
वीज आल्याने शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा तसेच दैनंदिन जीवनात मोठा बदल होणार असून, ग्रामस्थांनी आमदार सुनिल शेळके यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. वेताळनगरसाठी हा दिवस ऐतिहासिक ठरला असून, विकासाच्या दिशेने टाकलेले हे महत्त्वाचे पाऊल असल्याचे मत ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून या गावात वीज नव्हती. त्यामुळे नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागायचा. विद्यार्थ्यांना दिव्याखाली अभ्यास करावा लागायचा. तर महिलांनाही रात्री जेवण बनवण्यासाठी खूप अडचण यायची. गेल्या अनेक दिवसांपासून वीजपुरवठा करण्याची मागणी केली जात होती. त्यानंतर आता नागरिकांच्या प्रयत्नाला यश आले असून गावात वीज पोहचली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.