Railway  Saam Tv
मुंबई/पुणे

Pune-Lonavala Railway: कामशेत-तळेगावदरम्यान विशेष पॉवर ब्लॉक, रविवारी 'या' गाड्या असणार रद्द

Pune-Lonavala Power block: पुलाच्या कामानिमित्त पुणे-लोणावळा मार्गावरील कामशेत-तळेगावदरम्यान, विशेष पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा विशेष पॉवर ब्लॉक पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी घेण्यात येणार आहे.

Bhagyashree Kamble

पुलाच्या कामानिमित्त पुणे-लोणावळा मार्गावरील कामशेत-तळेगावदरम्यान, विशेष पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा विशेष पॉवर ब्लॉक येत्या रविवारी (५ जानवारीला) घेण्यात येणार असून, हे ब्लॉक पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेचासाठी घेण्यात येणार आहे. या दिवशी होणार्‍या गैरसोयीबद्दल प्रवाशांनी सहकार्य करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनानं केलंय.

पुणे-लोणावळा मार्गावरील कामशेत-तळेगावदरम्यान, पुलाच्या कामानिमित्त विशेष पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. ५ जानेवारीला हा विशेष पॉवर ब्लॉक घेण्यात येणार असून, हा पॉवर ब्लॉक सकाळी ११ ते दुपारी ३ वाजून ३५ मिनिटांपर्यंत असणार आहे. या वेळेत अप आणि डाऊन मार्गावर ये जा करणाऱ्या रेल्वे गाड्यांना १५ ते ३० मिनिटांचा ब्लॉक देण्यात येणार आहे.

त्यामुळे जर आपण रविवारी दिनांक ५ जानेवारीला काम किंवा सु्ट्टीनिमित्त बाहेर पडणार असाल, रेल्वेनं प्रवास करणार असाल तर, आपली काहीशी गैरसोय होऊ शकते. या दिवशी होणार्‍या गैरसोयीबद्दल प्रवाशांनी सहकार्य करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनानं केलं आहे. हा विशेष पॉवर ब्लॉकनिमित्त कोणत्या गाड्या रद्द करण्यात आले आहेत, जाणून घेऊयात.

१५ ते ३० मिनिटांपर्यंत रेल्वे गाड्या उशिराने धावणार

२२१५९ सीएसएमटी मुंबई-एमजीआर चेन्नई एक्स्प्रेस

१७२२ लोकमान्य टिळक- काकीनाडा एक्स्प्रेस

२२१९७ ग्वाल्हेर-दौंड एक्स्प्रेस

१२१६४ एमजीआर- चेन्नई-लोकमान्य टिळक एक्स्प्रेस

१६३३२ तिरुवनंतपुरम- सीएसएमटी मुंबई एक्स्प्रेस

२२९४३ दौंड-इंदूर एक्स्प्रेस

लोकल गाड्या रद्द

०१५६४ पुणे-लोणावळा

०१५६२ शिवाजीनगर-लोणावळा

०१५६१ लोणावळा-पुणे

०१५६३ लोणावळा-शिवाजीनगर

या मेल एक्सप्रेस गाड्यांच्या वेळेत बदल

११०२९ सीएसएमटी मुंबई कोयना कोल्हापूर एक्सप्रेस, सीएसएसटीहून ८:४० ऐवजी ११: १० ला सुटेल.

१२४९३ मिरज हसरत निजामुद्दीन मिरजहून ४: ५० ऐवजी ८: २० वाजण्याच्या सुमारास सुटेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local Block: मध्य रेल्वेवर २ दिवसांचा रात्रकालीन ब्लॉक; लोकलसह ट्रेनच्या वेळापत्रकात बदल, वाचा सविस्तर

Maharashtra Live News Update: मंत्री विखे पाटील यांचा जाहीर नागरी सत्कार घेण्यास नकार

Sakhi Gokhale: मन तुझं जलतरंग, लहरी तुझा साज...

Prabalgad Fort History: ट्रेकिंगसाठी खास! सह्याद्री पर्वतरांगेतील प्रबळगड किल्ल्याचे ऐतिहासिक वैशिष्ट्ये आणि इतिहास

अंगणाडी सेविकांना भाऊबीजेचं गिफ्ट! दिवाळीचा बोनस कधी मिळणार? आदिती तटकरेंनी थेट तारीख सांगितली

SCROLL FOR NEXT