Mega block: प्रवाशांनो लक्ष द्या! मध्य आणि हार्बर मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक, कुठे आणि कधी?

Central Railway Mega Block: मध्य रेल्वे, मुंबई विभाग २९-१२-२०२४ रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करत उपनगरीय विभागांवर मेगा ब्लॉक असेल.
Mega block
Mega blockyandex
Published On

मध्य रेल्वे, मुंबई विभाग २९-१२-२०२४ रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करत उपनगरीय विभागांवर मेगा ब्लॉक असेल. सीएसएमटी मुंबई ते विद्याविहार दरम्यान सकाळी १०.५५ ते दुपारी ३.२५ पर्यंत अप आणि डाऊन धीम्या मार्गावर मेगा ब्लॉक असेल. सकाळी १०.४८ ते दुपारी ३.१८ पर्यंत सीएसएमटी मुंबई येथून सुटणाऱ्या डाऊन धीम्या सेवा सीएसएमटी मुंबई आणि विद्याविहार स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येईल आणि भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकावर थांबेल आणि पुढे विद्याविहारला डाऊन धिम्या मार्गावर वळवण्यात येईल.

सकाळी १०.१९ ते दुपारी ३.१९ पर्यंत घाटकोपर येथून सुटणाऱ्या अप धीम्या सेवा विद्याविहार आणि सीएसएमटी मुंबई स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येईल आणि कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकांदरम्यान थांबेल. सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ पर्यंत पनवेल आणि वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्ग (पोर्ट लाईन वगळून) हार्बर लाइन ब्लॉक विभाग सकाळी १०.३३ ते दुपारी ३.४९ वाजेपर्यंत सीएसएमटीकडे जाणाऱ्या पनवेलकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा सकाळी ९.४५ ते दुपारी ३.१२ पर्यंत रद्द राहतील.

Mega block
Injection: इंजेक्शनला घाबरताय? काळजी करू नका; आता बिना सुईचं लागणार इंजेक्शन

ट्रान्स हार्बर लाईन ब्लॉक विभाग सकाळी ११.०२ ते दुपारी ३.५३ वाजेपर्यंत पनवेल येथून ठाण्याकडे जाणाऱ्या अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि ठाणे येथून पनवेलकडे जाणाऱ्या पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या डाऊन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा सकाळी १०.०१ ते दुपारी ३.२० पर्यंत रद्द राहतील. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी मुंबई-वाशी भागावर विशेष लोकल चालतील.

Mega block
Mahadev Betting App: महादेव बेटींग अ‍ॅपचं बीड कनेक्शन? पाहा स्पेशल रिपोर्ट

ब्लॉक कालावधीत ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाईन सेवा उपलब्ध असेल. ब्लॉक कालावधीत बेलापूर/नेरुळ आणि उरण स्थानकांदरम्यान पोर्ट लाईन सेवा उपलब्ध असेल. हे मेंटेनन्स मेगा ब्लॉक्स पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत. प्रवाशांना विनंती करण्यात आली आहे की, त्यामुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे.

Mega block
Viral Video: भयंकर! चक्क विजेच्या तारेवर कपडे सुकवले; म्हणाला- करंट नाही, पाहा व्हायरल VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com