PUNE KETAN AGRAWAL DEATH CASE: SIA AND CHETAN'S PLAN A, B & C MURDER PLOT EXPOSED saam tv
मुंबई/पुणे

Pune Ketan Agrawal Death Case: पहिला प्लॅन हुकला, दुसरा सक्सेसफुल; केतनला संपवण्यासाठी सिया आणि चेतननं आखला होता प्लॅन A, B, C

Ketan Agrawal Case, Pune: केतनला मारण्यासाठी सिया आणि चेतनने तीन प्लॅन आखले होते. यात प्लॅन A अयशस्वी ठरला, तर तेव्हा प्लॅन B तो प्लॅनही फसला असता प्लॅन C ही त्यांनी तयार ठेवला होता.

Bharat Jadhav

  • सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी हत्येचा कट रचला

  • केतनला मारण्यासाठी प्लॅन A, प्लॅन B आणि प्लॅन C तयार ठेवण्यात आले होते.

  • पुणे पोलिसांकडून प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.

पुण्याच्या केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणात नव-नवीन खळबळजनक खुलासे होत आहेत. केतन अग्रवाल याला त्याची होणारी पत्नी सिया गोयलनं लोहगडावरील 400 फूट खोल दरीत ढकलून दिलं. सियाला केतनशी लग्न करायचं नव्हतं, म्हणून तिनं तिचा बॉयफ्रेंड चेतन चौधरीच्या मदतीनं केतनला संपवण्याचा कट रचला होता.

प्रत्यक्ष हत्येच्या चार दिवस आधीच, सिया गोयलनं केतनला दरीत ढकलून जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. त्याला मारण्यासाठीचा तो प्लॅन A होता. जेव्हा प्लॅन A अयशस्वी ठरला, तेव्हा सिया गोयल आणि चेतन चौधरीनं प्लॅन B (Plan B) आखला. इतकंच नाही तर, तो प्लॅनही फसला असता तर त्यांनी प्लॅन C (Plan C) देखील तयार ठेवला होता.

केतनला मारण्यासाठीचा प्लॅन A काय होता?

केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी ANI शी बोलताना धक्कादायक खुलासा केलाय. सिया आणि केतन यांनी लोहगड किल्ल्याला तीनवेळा भेट दिली होती. 14 जून रोजी म्हणजेच हत्येच्या चार दिवसाआधी सिया केतनला लोहगडावर घेऊन गेली. हा तिच्या कटाचा प्लॅन A होता. याच भेटीदरम्यान सियानं केतनच्या जीवावर पहिला प्रयत्न केला. तिनं त्याला किल्ल्यावरून दरीच्या दिशेनं ढकललं होतं.

पण त्यावेळी केतननं एका झुडपाला पकडलं आणि त्यामुळे त्याचे प्राण वाचले. आपलं गुपित उघड होण्याच्या बेतात असतानाच सियानं चलाखीनं "साप! साप!" असं ओरडत केतनला जाऊन मिठी मारली होती. केतनला वाटलं की, तिथे खरोखरंच साप होता आणि सापापासून वाचवण्यासाठीच सियानं त्याला ढकललं. पण तिचा प्लॅन ए होता.

सिया आणि चेतनचा प्लॅन B काय होता?

हत्येच्या प्लॅन बी नुसार सियानं केतनला लोहगडावर नेलं आणि त्याला दरीत ढकलतं त्याची हत्या केली.केतन अग्रवालच्या कुटुंबीयांच्या मते, 19 जून रोजी सियाचा वाढदिवस होता.त्याच्या एका दिवसाआधीच सियानं प्री-बर्थडे सरप्राइजच्या निमित्तानं केतन अग्रवालला लोणावळ्यातील लोहगढ किल्ल्यावर नेलं होतं. पुणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्यावेळी सिया गोयल आणि केतन अग्रवाल लोहगडावर होते, त्याचवेळी सियाचा बॉयफ्रेंड चेतन चौधरीसुद्धा तिथे उपस्थित होता. चेतननं त्याचा मोबाईल कोंढवामधील आपल्या घरी ठेवलेला होता.

तसेच त्याच्या मोबाईलचं इंटरनेट सकाळपासून बंद होतं. त्यानंतर त्यानं स्वतःची ओळख लपवण्यासाठी हुडी घातली होती. त्याने चेहरा पूर्णपणे लपवला होता. चौकशीदरम्यान एवढ्या भर उन्हात थंडी वापरलं जाणं हुडी कोण घालतं? असा संशय पोलिसांना आला. त्यानंतर पोलिसांना त्याचा संशय आला. लोहगडावर केतन आपल्या मोबाईलने फोटो काढत होता, त्यावेळी सियानं त्याला दरीत ढकललं. त्यानंतर तिनं पोलिसांना फोन करुन केतन पाय घसरून खाली पडल्याचं सांगितलं. पोलीस आणि कुटुंबीय घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी सर्वांना अपघाती मृत्यू वाटला आणि सिया गोयलचा प्लॅन B (Plan B) यशस्वी झाला.

सिया गोयलचा प्लॅन C काय होता?

प्लॅन बी नुसार सियानं केतनला लोहगडावर नेलं आणि आपल्या कटाला अंतिम रुप दिलं. परंतु जर सिया आणि चेतनचा प्लॅन बी फसला असता तर त्या दोघांनी केतनला संपवण्यासाठी प्लॅन सी सुद्धा तयार केला होता. केतनच्या वडिलांचा आरोप आहे की, सियानं त्यांच्या मुलाच्या हत्येचा मोठा कट रचला होता. जर लोहगडावर प्लॅन B अयशस्वी ठरला असता, तर महाबळेश्वरमध्ये केतनचा जीव घेण्याचा सियाचा इरादा होता. तिनं चेतनच्या मदतीनं आधीच प्लॅन C तयार करून ठेवला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अलार्म बंद करून पुन्हा झोपी जाता, सकाळी लवकर का जाग येत नाही? जाणून घ्या पहाटे लवकर उठण्याचा मंत्र

Sindhudurg Earthquake: भूकंपाच्या धक्क्याने सिंधुदुर्ग हादरले, घरांच्या भिंतींना तडे; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, पाहा VIDEO

Maharashtra News Live Update: यवतमाळ जिल्ह्यात दमदार पावसाला सुरुवात

पावसाळ्यात नेसण्यासाठी साडीचे ५ लेटेस्ट ट्रेंडिंग पॅटर्न; प्रत्येक महिलेला उठून दिसतील

Beed Crime: हॉटेलबाहेर ८ ते ९ जणांकडून हल्ला, पोटात चाकू भोसकला; विलास घुले हत्याकांडाचा थरारक VIDEO समोर

SCROLL FOR NEXT