Pune Fugewadi suspicious deaths : Saam Tv
मुंबई/पुणे

Pune: हातभट्टीवरची दारू, मिथेनॉल ऑनलाइन मागवलं; २२ जणांचा जीव घेणाऱ्या विषारी दारूकांडाचा घटनाक्रम उघड, हादरवणारी माहिती समोर

Pune Fugewadi Suspicious Deaths: पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये विषारी दारूने २२ जणांचा बळी घेतला. या विषारी दारूकांडाचा संपूर्ण घटनाक्रम समोर आला आहे. पोलिस तपासातून हादरवणारी माहिती समोर आली.

Priya More
  • पुणे विषारी दारू प्रकरणात धक्कादायक खुलासा

  • मिथेनॉल मिसळून तयार केलेली हातभट्टीची दारू

  • पिंपरी- चिंचवड दारूकांडातील आरोपींना अटक

  • विषारी दारूमुळे आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू

गोपाळ मोटघरे, पिंपरी-चिंचवड

विषारी दारू प्यायल्याने पिंपरी- चिंचवड आणि पुणे शहरात आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू झाला आहे. हा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र ही विषारी दारू नेमकं कुठे बनवण्यात आली? तसेच ती दारू पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात कशाप्रकारे विक्री करण्यासाठी वितरित करण्यात आली? हा संपूर्ण घटनाक्रम समोर आला आहे. यातून धक्कादायक माहिती उघड झाली आहे.

विषारी दारू तयार करणे आणि विक्री प्रकरणात पिंपरी चिंचवड शहर पोलिसांनी राजू प्रजापती, योगेश वानखेडे आणि कर्नलसिंग तख्तसिंग विरखा या मुख्य ३ आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. यापैकी कोणी दारू तयार केली? कोणी दारूत मिथेनॉल मिश्रित केलं? आणि त्यानंतर नेमकं कशा प्रकारे ती दारू विक्री करण्यासाठी वितरित करण्यात आली? हा संपूर्ण घटनाक्रम आपण पाहणार आहोत...

- राजू प्रजापती यांच्या उरळी कांचन येथील अड्ड्यावर सुरुवातीला हातभट्टीवर देशी दारू बनवण्यात आली.

- योगेश वानखेडे हा राजू प्रजापती यांच्याकडून नियमित देशी हातभट्टी दारू विकत घ्यायचा.

- काही दिवसांपूर्वी योगेश वानखेडे यांनी मुंढवा भागातील इंडिया मार्टच्या साइटवर इथेनॉल/ मिथेनॉलबाबत माहिती आपल्या मोबाईलमध्ये सर्च केली.

- योगेश वानखेडेला मुंबईच्या REX इंटरनॅशनल कंपनीकडून मिथेनॉल पुरवठा करण्याचा मेसेज प्राप्त झाला.

- कंपनीने त्याच्याकडे मिथेनॉल पुरवठा करण्यासाठी जीएसटी नंबर आणि आधार कार्डची मागणी केली.

- योगेश वानखेडेने मांजरी येथील एका शॉपमधून प्रदीप शर्मा नावाने बनावट आधार कार्ड बनवले.

- २९ एप्रिल २०२६ ला योगेश वानखेडेने REX इंटरनॅशनल कंपनीकडे २१५ लिटर मीथेनॉल व्हॉट्सअपद्वारे ऑनलाईन बुकिंग केलं. त्यासाठी त्याने आपल्या मित्राच्या अकाउंटवरून 17 हजार 500 रुपये पेमेंट REX कंपनीला पाठविले

- ९ मे २०२६ ला २१५ लिटर मीथेनॉल एसीपीएल ट्रान्सपोर्ट (अविनाश कार्गो) भोसरी येथील गोडाऊन मध्ये आले.

- योगेश वानखेडेने तिथून मिथेनॉल प्राप्त करून पोर्टरच्याद्वारे खडकी रेल्वे स्टेशन समोरील कल्पेश अग्रवाल यांच्या ताडीच्या दुकानात आणले.

- त्यानंतर योगेश वानखेडेने राजू प्रजापती याच्याकडून प्रत्येकी 35 लिटर देशी हातभट्टी दारू असलेले पाच कॅन दारू आणली. ५ कॅन दारू मध्ये पाणी दहा पाणी टाकून त्याची दहा कॅन दारू तयार केली

- २३ मे २०२६ ला योगेश वानखेडेने कल्पेश अग्रवाल यांच्या ताडीच्या दुकानात ५० लिटर मिथेनॉल वापरून १२ कॅन देशी हातभट्टी दारू बनवली. दारूच्या नशेची तीव्रता वाढवण्यासाठी बहुतेक त्याने त्यात मिथेनॉल चा वापर केला

- २५ मे २०२६ ला योगेश वानखेडेने मिथेनॉल मिश्रित हातभट्टी दारूच्या पाच कॅन फुगेवाडी येथील कर्नेलसिंग विरखाला विक्री साठी दिल्या. तसेच त्याने ६ कॅन हडपसरच्या आकाश जाधवला विक्रीसाठी दिल्या तसेच एक कॅन त्याने दापोडी येथील इरफान उर्फ पप्पू कुरेशी याला विक्री करण्यासाठी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मायेपुढे बिबट्याही नमला; सासूसाठी सुनबाई आणि नातू बिबट्याला भिडले!

Brain Tumour : 'ही' ६ लक्षणे अजिबात इग्नोर करू नका, अन्यथा ब्रेन ट्युमर झाल्याचेही समजणार नाही

Murud-Janjira Fort : मुरुड-जंजिरा किल्ला पूर्वी कोणत्या नावाने ओळखला जायचा? समुद्रात दडलंय रहस्य

Aadhaar Card Rule: आधार कार्डमध्ये नाव, मोबाईल नंबर अन् पत्ता किती वेळा बदलता येतो?

Mumbai : मुंबईत ATS ची मोठी कारवाई, केनियाच्या नागरिकाला अटक; नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT