Pune Crime News  Saam tv
मुंबई/पुणे

Pune Crime News : धावत्या PMPML बसमध्ये महिलेसमोरच प्रवाशाचे घाणेरडं कृत्य, पुण्यातील संतापजनक घटना

Pune Crime Update News In Marathi : पुण्यात धावत्या पीएमपीएमएल बसमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. एका प्रवाशानं महिलेसमोरच अश्लील चाळे केले.

Saam TV News

सचिन जाधव

Pune Crime Update News In Marathi : पुण्यात धावत्या पीएमपीएमएल बसमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. एका प्रवाशानं महिलेसमोरच अश्लील चाळे केले. या प्रकरणी महिलेने पोलिसांत तक्रार केल्यानंतर संबंधिताविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पुण्यातील लोहगाव येथील संजय पार्क परिसरात ही संतापजनक घटना घडली. धावत्या पीएमपीएमएल (PMPML Bus) मध्ये एका प्रवासी महिलेचा अनोळखी व्यक्तीने विनयभंग केला. संशयित आरोपीने महिलेसमोरच अश्लील चाळे केले. हडपसर ते निगडी या दरम्यान प्रवास करणाऱ्या महिलेसोबत ही घृणास्पद घटना घडली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील (Pune) लोहगाव येथील संजय पार्क परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी २७ वर्षीय महिलेने तक्रार दिली. त्यानंतर विमानतळ पोलीस (Vimantal Police Station) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित महिला हडपसर ते निगडी या बसने प्रवास करत होती. बसमध्ये चालकाच्या डाव्या बाजूला असलेल्या सीटवर त्या बसलेल्या असतानाच अनोळखी व्यक्तीने तिच्यासमोर येत घाणेरडे चाळे केले. या प्रकरणी पीडितेने तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी संबंधित संशयित आरोपीविरोधात गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणी विमानतळ पोलीस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Airport: मुंबई विमानतळावर मोठी कारवाई, ४० किलोचा गांजा जप्त; तिघांना बेड्या

Horrific Accident : बड्या सरकारी अधिकाऱ्याचा भीषण अपघातात मृत्यू, पत्नीची प्रकृती चिंताजनक

Ind W Vs Aus W : टीम इंडियाचा दारूण पराभव, भारताने सामना ८ विकेट्सने गमावला

Parbhani: पान टपरी बैलगाडीतून नेताना भयंकर घडलं, विजेचा धक्का लागून तिघांचा जागीच मृत्यू

पिंपरी चिंचवडची ऐतिहासिक शान – जगातील सर्वात उंच संभाजी महाराज स्मारक|VIDEO

SCROLL FOR NEXT