Police investigation underway after a 23-year-old youth was brutally murdered in Pune's Kothrud area over a dispute related to friendship with a minor girl. Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Crime : पुण्यातील तरुणाच्या हत्येचं धक्कादायक कारण उघड; मैत्रिणीनं नेमका काय मेसेज केला होता?

Kothrud Pune Youth Murder Case Details: पुण्यातील कोथरूड परिसरात 23 वर्षीय नागेश जाधव याची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अल्पवयीन मुलीशी मैत्री असल्याच्या रागातून दहा जणांच्या टोळीने त्याला मारहाण करून ठार केल्याचा आरोप आहे.

Omkar Sonawane

सागर आव्हाड, साम टीव्ही

पुणे: शिक्षणाचे माहेरघर असलेले पुणे आता गुन्हेगारीचे माहेरघर झाले आहे की काय असा संतापजनक प्रश्न उपस्थित आहे. मागच्या काही वर्षांपासून पुण्यामध्ये रोजच थरकाप उडवून देणाऱ्या घटना घडत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच कोथरूड भागात काळजाला हादरवून टाकणारी घटना घडली आहे. एका अल्पवयीन मुलीशी मैत्री असल्याच्या रागातून 10 जणांच्या टोळीने मिळून एका तरुणांची निर्घृण हत्या केल्याची घटना 14 मार्च (दि.शनिवारी) घडली आहे.

नागेश जाधव वय(23) असे हत्या झालेल्या या तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. आता या घटनेची पोलिसांनी माहिती दिली आहे. पुण्यात एका तरुणाची केवळ मुलीशी बोलत असल्याच्या कारणावरून निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणात दहा जणांविरुद्ध कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून काही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. नागेश आणि एक अल्पवयीन मुलगी हे एकमेकांच्या ओळखीचे होते आणि दोघेही मित्र असल्याचे सांगितले जात आहे. मात्र या मैत्रीवरून मुलीच्या कुटुंबीयांना आक्षेप होता, या शिल्लक कारणावरून मुलीच्या कुटुंबीयांनी त्या मुलांला मारून टाकले.

नेमके काय घडले? आमच्या मुलीशी का बोलतो अन्...;

नरेश जाधव आणि संबंधित अल्पवयीन मुलीची अनेक दिवसांपासून मैत्री होती. मात्र या मैत्रीला मुलीच्या कुटुंबाला तीव्र आक्षेप होता. नागेश हा पुण्यातील शिवाजीनगर येथे ऑफिस बॉय म्हणून काम करत होता, तर त्याची आई घरकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होती. मृत नागेशच्या आईने केलेल्या खळबळजनक आरोपानुसार, त्या मुलीनेच नागेशला मोबाईलवरून मेसेज करून भेटण्यासाठी बोलावून घेतले होते. नागेश तिला भेटण्यासाठी गेला असता तिथे आधीच मुलीच्या घरचे लपून बसलेल्या कुटुंबाने त्याच्यावर जीवघेणा हल्ला चढविला आणि त्याला बेदम मारहाण केली आणि यामध्ये त्याचा जागेवर मृत्यु झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : एल्फिन्स्टन पुलाच्या पाडकामामुळे मध्य रेल्वे विस्कळीत प्रवाशांची मोठी गर्दी

मोठी बातमी! आधी बायको आता भोंदू बाबाचा मुलगाही फरार; हर्षवर्धन खरात नॉट रिचेबल, तपास यंत्रणेवर प्रश्नचिन्ह

Onoin- Garlic Hair Oil: काळेभोर लांब केसांसाठी 'कांदा- लसूण' तेल ठरेल फायदेशीर, बनवण्याची पद्धत आहे सोपी

लग्नाच्या वरातीत जमिनीवरून सपासप वार, काका आणि भावाची हत्या, वर्धा हादरले

Cholesterol signs on face: तुमच्या त्वचेमध्ये हे बदल दिसले तर समजा कोलेस्ट्रॉल वाढलंय; 8 लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

SCROLL FOR NEXT