Pune Kothrud Crime news Saam Tv News
मुंबई/पुणे

बाथरूममध्ये आले अन्..., पोलिसांनी नको ते प्रश्न विचारले; पुण्यातील तरूणीचे धक्कादायक आरोप

Pune Kothrud Crime News: कोथरूड पोलिसांकडून तिघा तरुणींवर शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा गंभीर आरोप. पोलीस स्टेशनमध्ये जातीवाचक शिवीगाळ, खाजगी प्रश्न आणि अपमानकारक वर्तन.

Bhagyashree Kamble

  • कोथरूड पोलिसांकडून तिघा तरुणींवर शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा गंभीर आरोप.

  • पोलीस स्टेशनमध्ये जातीवाचक शिवीगाळ, खाजगी प्रश्न आणि अपमानकारक वर्तन.

  • रोहित पवार व आंबेडकर कार्यकर्त्यांकडून अॅट्रॉसिटी अंतर्गत कारवाईची मागणी.

पुण्यातील कोथरूड पोलीस ठाण्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. तीन तरूणींचा पोलिसांकडून मानसिक तसेच शारीरिक छळ करण्यात आला. छत्रपती संभाजीनगरमधील एका प्रकरणाच्या तपासासाठी त्यांना कोथरूड पोलीस ठाण्यात नेण्यात आलं. मात्र, पोलिसांनी तीन तरूणींना ताब्यात घेत बंद खोलीत जातीवाचक शिवीगाळ आणि मानसिक छळ केला. या प्रकरणाबाबत पीडित तरूणींनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत.

एका पीडित तरूणीनं सांगितलं की, 'मुळात ही केस छत्रपती संभाजीनगरमधील आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पोलीस आमच्या घरी आले होते. पोलिसांनी आम्हाला जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच खासगी आयुष्याबाबत नको ते प्रश्न विचारलं. तसेच बेदम मारहाण केली', असा आरोप पीडित महिलेनं केला. पोलिसांनी कोणतेही वॉरंट नसतानाही घरात घुसून छळ केला असल्याचा आरोपही यावेळी त्यांनी केला.

'पोलीस आमच्या बाथरूममध्ये घुसले. नंतर बेडरूममध्ये घुसले. त्यांनी आमच्या इनरवेअरची तपासणी केली. आम्ही त्यांना जाब विचारला. तेव्हा त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये चला, दाखवतो, अशी धमकी दिली' असा आरोप पीडित महिलेनं केला.

पुण्यात कोथरूड पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या मांडून आंदोलन केलं. मात्र, त्यांच्या आंदोलनाला फारसं यश प्राप्त झालं नाही. यानंतर त्या घरी परतल्या. तरूणींच्या मागणीप्रमाणे अद्याप पोलिसांवर कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.

३ ऑगस्ट रोजी पीडित तरूणींसह आमदार रोहित पवार यांनी आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांच्यासोबत चर्चा केली. या चर्चेदरम्यान, राष्ट्रवादीचे प्रशांत जगताप, अंजली आंबेडर आणि सुजात आंबेडकर यांच्यासह शहरातील सामाजिक कार्यकर्तेही उपस्थित होते. दरम्यान, चर्चा करूनही गुन्हा दाखल न झाल्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : आई शप्पथ सांगतो, कमळाला मतदान करू नका - माजी मंत्री महादेव जानकर

आता हिंदु देवतांचेही 'धर्मांतरण'; काली मातेची केली मदर मेरी

Lucky zodiac signs: शुक्ल पंचमीनिमित्त आजचा शुभ दिवस; कोणत्या राशींना आर्थिक फायदा?

Raj Thackeray: 'मराठी माणसासाठी BMC निवडणूक शेवटची; राज ठाकरेंनी कोणत्या धोक्याचा इशारा दिला?

Rahul Gandhi: राहुल गांधी अ‍ॅक्शन मोडवर, बिहारमधील पराभवानंतर काँग्रेसच्या ७ बड्या नेत्यांची हकालपट्टी

SCROLL FOR NEXT