Attempt to murder case against Congress leader in Pune साम टीव्ही मराठी
मुंबई/पुणे

PUNE VIOLENCE: पुण्यात खळबळ, कोयत्याने २ जणांवर हल्ला, काँग्रेसच्या नेत्याविरोधात गुन्हा दाखल

Attempt to murder case against Congress leader in Pune : नारायण पेठ, पुणे येथे साइनबोर्ड लावण्यावरून गोंधळ आणि हाणामारी झाली होती. याप्रकरणी गोपाळ तिवारी यांच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सागर आव्हाड, सामटीव्ही, पुणे

  • नारायण पेठ पुण्यात साइनबोर्ड काढण्यावरून दोन गटांत वाद.

  • कोयत्याने हल्ल्यात दोन तरुण जखमी, पोलीस तक्रार दाखल.

  • काँग्रेस नेते गोपाळ तिवारी यांच्यासह ६ जणांविरोधात खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा.

  • चार आरोपींना अटक, पोलीस तपास सुरू.

FIR registered in Narayan Peth knife attack : पुण्यात काँग्रेसचे नेते गोपाल तिवारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी काँग्रेसचे नेते गोपाळ तिवारी यांच्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. पुण्यातील नारायण पेठेत २ गटात रोड वर बोर्ड लावण्यावरून हाणामारी झाली होती. याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करत सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यामध्ये काँघ्रेसचे नेते गोपाळ तिवारी यांचा समावेश आहे.

कोयत्याने वार करून एका गटातील २ तरुण जखमी  झाले होते. याप्रकरणी स्वप्नील रामचंद्र मोरे यांनी पोलिसात तक्रार दिली आहे. यावरून गोपाळ तिवारी यांच्यासह सहा जणांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुकुंद शिर्के (वय २७), हर्ष शिर्के (वय २९), निखिल जगताप (वय ३३) आणि अभिषेक थोरात (वय २२) यांना अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विनायक मित्र मंडळाचे कार्यकर्ते योगेश पेटकर मंडपवाले कलाटकर यांनी मुरलीधर हॉटेलजवळील रस्त्याच्या कडेला सूचना फलक लावला होता. फिर्यादी हे मंगळवारी तेथे आले होते. गोपाळ तिवारी व अन्य दोघे यांनी तो बोर्ड काढण्यास सुरुवात केली. तेव्हा मोरे यांनी हर्षद शिर्के याला बोर्ड काढू नका, तो बेकायदेशाीर असल्यास मनपा काढून घेतील, असे म्हणाले. यावरुन हर्षदने मला धक्का देऊन ते कोण मला सांगणारा असे म्हणून त्यांच्यात झटापट झाली आणि त्यानंतर ते त्यांना जवळील पोलिस चौकीत गेले. रात्री तीन तरुणांनी पुन्हा येऊन मोरे यांच्यावर वार केले. आपल्यावरील हल्ला गोपाळ तिवारी यांच्या सांगण्यावरुन झाल्याचे त्यांनी फिर्यादीत नमूद केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bogus Voter Scam: राहुल गांधींकडून पुराव्यांसह बोगस मतदारांचा भांडाफोड; सांगितली नोंदणीची मोडस ऑपरेंडी

Vantara:'माधुरी'नंतर वनताराचा 'गौरी'वर डोळा? गौरी हत्तीणीसाठी 3 कोटींची ऑफर?

Shocking : महाराष्ट्र हादरला! ७ वर्षीय विद्यार्थिनीवर शिक्षकाकडून अत्याचार, पालकांमध्ये संताप

Kharadi Rave Party: जावई खेवलकरांच्या मोबाईलमध्ये अश्लील व्हिडिओ फोल्डर, चाकणकरांच्या आरोपांनंतर सासरे खडसेंचा पारा चढला

Gold Found: भारताच्या हृदयात सोन्याची खाण, जबलपूरच्या भूमीत लपलाय 'सोन्याचा खजिना

SCROLL FOR NEXT