KETAN AGRAWAL MURDER CASE: FRESH REVELATIONS EMERGE IN PUNE POLICE INVESTIGATION saam tv
मुंबई/पुणे

केतन अग्रवाल हत्या प्रकरण नवी अपडेट: पोलिसांच्या नजरेतून वाचण्यासाठी चेतनने लढवली होती अनोखी शक्कल

Ketan Agrawal Case: केतन अग्रवाल हत्या प्रकरणाच्या तपासादरम्यान पुणे पोलिसांच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे लागले आहेत. पोलिसांपासून निसटण्यासाठी चेतनने शक्कल लढवली होती. यासह सियाने केतनच्या हत्येचा सराव केल्याची बाब उघडकीस आली आहे.

Bharat Jadhav

  • पोलीस आरोपींच्या कथित नियोजनाची आणि हालचालींची सखोल चौकशी करत आहेत.

  • तपासात डिजिटल पुरावे आणि इतर माहितीची पडताळणी सुरू आहे

  • लोहगडावर पोलिसांकडून सीन रिक्रिएशन करण्यात आलंय

पुण्यातील केतन अग्रवाल हत्याकांडाच्या तपासात नवनवे खुलासे होत आहेत. केतनला सियाचे चेतनसोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय होता. इतकेच नाहीतर केतन वाचला असता तर सियाने लग्न रद्द करण्याचा प्लॅन आखला होता असे धक्कादायक खुलासे समोर आल्यानंतर आता नवा खुलासा या प्रकरणात उघड झाला आहे. केतनाला संपवण्यासाठी सिया आणि चेतनने सराव केला होता. पोलिसांच्या नजरेपासून कस वाचायचं यासाठी चेतननं अनोखी शक्कल लढवली होती.

सियानं केतनला मारण्यासाठी गुगल आणि युट्युबवरील व्हिडिओचा आधार घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. केतनला मारण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टींचा अभ्यासही केला होता. केतन आणि सियाच्या पाठलाग करत लोहगडावर जाण्यासाठी चेतननं जी बाईक वापरलेली होती ती बाईक पोलिसांनी जप्त केली आहे.

पोलिसांच्या नजरेतून लपण्यासाठी चेतनची शक्कल काय?

लोहगड किल्ल्यावर जाण्यासाठी चेतन चौधरीने बाईकचा वापर केला होता. लोहगडला जाताना टोल नाक्यावर आपले वाहन दिसू नये यासाठी चेतनने दुचाकीचा वापर केला होता. २० जून रोजी केतन अग्रवाल याची हत्या करण्यात आली होती. सियाने केतनला लोहगडाच्या एका उंच कडावरून खाली ढकलत त्याचा जीव घेतला होता.

सिया केतनला जेव्हा लोहगडावर घेऊन गेली होती. त्यादिवशी चेतननेही त्यांच्या पाठोपाठ लगेच बाईकनं निघाला होता. बाईकनेच त्याचा पाठलाग करत तो लोहगडावर पोहचला होता. त्यानंतर सिया आणि चेतन यांनी नियोजित ठिकाणी केतनला नेत त्याला खाली ढकललं.

सियानं कसा रचला हत्येचा कट?

केतनला आपल्या मार्गातून हटवण्यासाठी चेतन आणि सिया यांनी गुगल आणि युट्युबमधून माहिती मिळवली होती. त्यांनी हत्येचे वेगवेगळे व्हिडिओ पाहून कट रचला होता. तसेच त्यासाठी त्यांनी त्याप्रकारे सराव केला होता. लोहगडावरील कोणत्या ठिकाणाहून ढकलल्यावर अपघात वाटेल याचा देखील त्यांनी अभ्यास केला होता.

केतनला विष देऊन मारता येईल का? याचीही चाचपणी दोघांनी केली होती. पोलिसांपासून बचाव कसा करता येईल? याचीही माहिती गुगलवर शोधली होती. त्याचाच एक भाग कार ऐवजी दुचाकीचा वापर चेतनने केला होता. संपूर्ण घटना अपघातासारखी कशी भासवायची याबाबतही दोघांनी माहिती काढली होती. घटनेआधी लोहगडावर जाऊन धक्का कसा द्यायचा, हत्या कशी करायची याचा सराव सिया आणि चेतनने केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ben Stokes : भारत-इंग्लंडच्या सामन्यांआधी मोठी बातमी! दिग्गज क्रिकेटपटूची तडकाफडकी रिटायरमेंट, क्रिडाविश्वात खळबळ

Maharashtra News Live Update: बालबेडा जंगलात माओवाद्यांचा शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त; पोलीस-सीआरपीएफची मोठी कारवाई

१,४०० किलोमीटर लांबी, ८ लेन; महाराष्ट्रासह पाच राज्यांना जोडणार द्रुतगती मार्ग, जाणून घ्या महामार्गाचे वैशिष्ट्ये

कितीही खासदार फोडा, उरावर भगवा फडकवणार, ओमराजेंच्या मतदारसंघात ठाकरेंची तोफ धडाडली

Spring Roll Recipe: घरच्या घरी बनवा टेस्टी स्प्रिंग रोल; वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT