कोथिंबीर आठवडाभर ताजी कशी ठेवायची?

Manasvi Choudhary

कोथिंबीर

कोथिंबीर रोजच्या आहारातील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. अनेक भाज्या आणि डाळींची चव व सुगंध वाढवण्यासाठी कोथिंबिरीचा वापर केला जातो. कोथिंबीरची वडी आणि भजी देखील खमंग व चवदार लागतात.

Fresh Coriander | pinterest

कोथिंबीर साठवण्याची योग्य पद्धत

मात्र, बाजारातून कोथिंबीर आणल्यानंतर ती लवकर सुकते किंवा ओलाव्यामुळे कुजून खराब होते. यासाठी कोथिंबीर आठवडाभर ताजी आणि हिरवीगार ठेवण्यासाठी सोपी पद्धत लक्षात ठेवा.

कोथिंबीर साठवण्याची योग्य पद्धत

बाजारातून कोथिंबीर घेताना हिरवीगार पाने आणि हिरवेगार देठ असलेली कोथिंबीर निवडा. ज्या कोथिंबिरीची पाने पिवळी, काळी किंवा मऊ पडली आहेत अशी कोथिंबीर घेणे टाळा.

How To Keep Coriander Fresh For A Week

फ्रिजमध्ये कोथिंबीर ठेवताना घ्या काळजी

फ्रिजमध्ये ठेवण्यापूर्वी त्यातील खराब किंवा सडलेली पाने काढून टाका. कोथिंबीर ओली असल्यास एका सुती कापडाने हळुवार पुसून कोरडी करा.

How To Keep Coriander Fresh For A Week

कोथिंबीर साठवण्याची सर्वात योग्य पद्धत

कोथिंबीर साठवताना एखाद्या फुलाप्रमाणे काळजी घ्यावी लागते.

सर्वातआधी देठांची टोके किंचित कापून घ्या. त्यानंतर एका काचेच्या बरणीमध्ये थोडे पाणी घ्या आणि त्यात कोथिंबीर उभी ठेवा.

फक्त देठ पाण्याला स्पर्श करतील आणि पाने पाण्याच्या वर राहतील अशा पद्धतीने ठेवा.

बरणीतील पाणी गढूळ किंवा घाण झाल्यावर ते नियमितपणे बदला.

How To Keep Coriander Fresh For A Week | pinterest

पेपर टॉवेल पद्धत

जर तुम्हाला पाण्याची बरणी वापरायची नसेल, तर सुकलेली कोथिंबीर पेपर टॉवेलमध्ये हलक्या हाताने गुंडाळून पिशवीत किंवा हवाबंद डब्यात ठेवा.

पेपर टॉवेल कोथिंबिरीच्या पानांभोवती साचणारा अतिरिक्त ओलावा शोषून घेण्यास मदत करतो. जर पेपर टॉवेल खूप ओला झाला, तर तो बदलून दुसरा कोरडा टॉवेल वापरा.

Store Coriander

पाण्यात जास्त वेळ धुवू नका

कोथिंबीर आठवडाभर टिकवून ठेवण्यासाठी ती साठवण्यापूर्वी पाण्यात जास्त काळ धुवू किंवा भिजवून ठेवू नका. अतिरिक्त ओलाव्यामुळे कोथिंबीर लवकर काळी पडते आणि खराब होते.

How To Keep Coriander Fresh For A Week | pinterest

NEXT: घरच्या घरी सिल्क साडी धुवायची कशी?

How To Wash Silk Saree At Home | Saam Tv
येथे क्लिक करा...