Sia Goyal produced in court amid lawyer dispute in Ketan Agarwal murder case saam tv
मुंबई/पुणे

केतन अग्रवाल हत्याप्रकरणात नवा ट्विस्ट! सिया गोयलचं वकीलपत्र कोणाकडे? कोर्टात दोन वकिलांमध्ये गोंधळ

Lohagad Trip Under Suspicion in Ketan Agarwal Killed Case: केतन अग्रवाल हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट समोर आला असून सिया गोयलच्या वकीलपत्रावरून दोन वकिलांमध्ये वाद निर्माण झाला आहे. लोहगड किल्ल्याच्या सहलीमागे पूर्वनियोजित कट होता का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Omkar Sonawane

गोपाल मोटघरे,साम टीव्ही

पुणे: केतन अग्रवाल खून प्रकरणात आरोपी सिया गोयल हिला कोर्टात हजर करण्यापूर्वीच मोठा वाद उफाळून आला आहे. सिया गोयलच्या वकीलपत्रावरून दोन वकिलांमध्ये थेट वाद पाहायला मिळत आहे. अ‍ॅड.विपुल दुशिंग आणि अ‍ॅड आशुतोष श्रीवास्तव या दोघांनीही स्वतःला सिया गोयलचा अधिकृत वकील असल्याचा दावा केला आहे. सिया गोयल प्रकरणात अ‍ॅड आशुतोष श्रीवास्तव यांनी आपणच तिचे वकील असल्याचा दावा केला आहे. मात्र अ‍ॅड विपुल दुशिंग यांनी हा दावा फेटाळून लावत, सिया गोयल आणि तिच्या कुटुंबीयांनीच मला अधिकृत वकील म्हणून नियुक्त केल्याचे सांगितले आहे.

मागील पाच दिवसांपासून सिया गोयलचे कुटुंबीय माझ्या संपर्कात असून त्यांनी मला वकीलपत्र दिले आहे. तसेच वकीलपत्रावर सही करण्यासाठी न्यायालयाची विशेष परवानगी घेऊन आम्ही पोलीस ठाण्यात जाऊया प्रक्रिया पूर्ण केल्याची माहिती अ‍ॅड दुशिंग यांनी दिली आहे. दरम्यान अ‍ॅड आशुतोष श्रीवास्तव हे अधिकृत वकील आहेत का, याचा अंतिम निर्णय न्यायालयच घेईल, असे अ‍ॅड दुशिंग यांनी स्पष्ट केले. याशिवाय सिया गोयल तपासात सहकार्य करत असल्याने तिला पोलीस कोठडीची आवश्यकता नसल्याची मागणी अ‍ॅड दुशिंग यांनी केली आहे.

सियाचा लोहगडला जाण्याचा हट्ट फक्त केतनला मारण्यासाठीच होता?

केतन अग्रवाल हत्या प्रकरणात तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे नवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. सिया हिने लोहगड किल्ल्यावर जाण्याचा केलेला वारंवार आग्रह हा केवळ सहलीसाठी नव्हता, तर त्यामागे मोठा कट होता का? असा गंभीर संशय आता उपस्थित केला जात आहे. अग्रवाल कुटुंबीयांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, सिया हिने केतनला लोहगडला नेण्यासाठी सातत्याने दबाव टाकला होता. केतनला पर्वतरांगांमध्ये फिरण्याची आवड असल्याचा सियाने फायदा घेतला, असा आरोपही कुटुंबीयांनी केला आहे.

३० मे रोजी अग्रवाल कुटुंबीयांनी दोघांना लोहगडला जाण्याची परवानगी दिली होती.

त्यानंतर अवघ्या पाच दिवसांत सियाने पुन्हा लोहगडला जाण्याचा आग्रह धरला.

४ जून रोजी कुटुंबीयांनी परवानगी नाकारताच सियाने संताप व्यक्त करत आकांडतांडव केल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.

याच दिवशी लोहगडला न नेल्यामुळे सियाने केतनला त्रास दिल्याचाही आरोप आहे.

पुन्हा १४ जून रोजी सियाने केतनकडे लोहगडला जाण्याचा हट्ट धरला, मात्र तो प्लॅन फसला.

अखेर १८ जून रोजी वाढदिवसाचे कारण देत सियाने केतनला लोहगड किल्ल्यावर नेले आणि तिथून ढकलून दिल्याचा गंभीर आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

या संपूर्ण प्रकरणात सियाचा लोहगडला जाण्याचा हट्ट हा पूर्वनियोजित कटाचा भाग होता का, याचा तपास आता पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: केतन अग्रवाल खून प्रकरणात, 7 दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर सिया गोयल आणि केतन चौधरी कोर्टात हजर

Priyanka Chopra: कान्स लायन्समध्ये प्रियांका चोप्राचा ग्लॅमरस अंदाज; लाखांच्या ड्रेसने वेधलं सर्वांचं लक्ष

डोळ्याच्या कॅन्सरची सुरुवातीची 5 लक्षणं चुकूनही दुर्लक्ष करू नका; नाहीतर होऊ शकतो मोठा त्रास

Thane News : ठाणेकरांनो, दोन दिवस नाही येणार पाणी! ठाणे महापालिकेचा पाणीपुरवठ्यासंदर्भात मोठा निर्णय

Bribe Case: महिला पोलीस अधिकाऱ्याने २५ हजाराची लाच मागितली; गुन्हा दाखल होताच Suspend,पोलीस दलात खळबळ

SCROLL FOR NEXT