Shocking Incident in Pune Saam
मुंबई/पुणे

कुत्रा मागे लागला अन् घाबरून पळाला, तिसऱ्या मजल्यावरून पडला; पुण्यातील इलेक्ट्रिशियनचा मृत्यू

Shocking Incident in Pune: कुत्रा मागे लागल्याने तिसऱ्या मजल्यावर खाली कोसळला अन् जीव गमावला. इलेक्ट्रिशियनचा उपचारादरम्यान मृत्यू. पुण्यातील कसबा पेठेतील घटना.

Bhagyashree Kamble

  • पुण्यातील इलेक्ट्रिशियनचा दुर्दैवी मृत्यू

  • कुत्रा मागे लागल्याने घाबरून पळाला आणि थेट सोसायटीच्या डक्टमध्ये पडून मृत्यू

  • कसबा पेठेतील धक्कादायक घटना

पुण्यातून दुर्देवी घटना समोर आली आहे. कुत्रा मागे लागल्याने तिसऱ्या मजल्यावरून पडून एका इलेक्ट्रिशियनचा मृत्यू झाला आहे. घटना घडल्यानंतर त्यांना तातडीने रूग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. ही घटना घडल्यानंतर कुत्र्याचे मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, ही घटना उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली आहे.

रमेश गायकवाड (वय ४५) असे मृत्युमुखी पडलेल्या इलेक्ट्रिशियनचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना पुण्यातील कसबा पेठेत घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रमेश गायकवाड हे इलेक्ट्रिशियन आहेत. १ ऑक्टोबर रोजी काम करण्यासाठी कसबा पेठेतील सिद्धिविनायक अपार्टमेंटमध्ये एका सहकाऱ्यासोबत आले होते.

अपार्टमेंटच्या तिसऱ्या मजल्यावर काम सुरू असतानाच, चौथ्या मजल्यावर सिद्धार्थ कांबळे यांचा कुत्रा गायकवाड यांच्या मागे लागला. त्यामुळे भयभीत झालेले गायकवाड हे जिन्यावरून पळत होते. पळता पळता ते थेट इमारतीच्या डक्टमधून खाली पडले. या घटनेनंतर स्थानिकांनी त्यांना तातडीने रूग्णालयात दाखल केले.

गंभीर जखमी झालेल्या रमेश गायकवाड यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपी सिद्धार्थ कांबळे याने कुत्रा पाळण्याबाबत योग्य ती खबरदारी घेतली नाही म्हणून त्याच्याविरोधात फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amravati Accident : अपघाताचा थरार, भरधाव कारने चौघांना उडवलं; संतप्त लोकांनी कोर फोडली, अमरावतीमधील घटना

Mumbai Police Transfer : मुंबईतील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या रखडल्या, कारण काय?

Maharashtra Live News Update: भरधाव अनियंत्रित चारचाकी कारने चार जणांना उडवले.अमरावती शहरातील मोती नगर मधील धक्कादायक घटना

Hair Care: तुमच्या केसांसाठी कोणता शॅम्पू आहे परफेक्ट, एकदा जाणून घ्या

पतीशी भांडण, पोलिसाशी अफेअर, शरीरसंबंध अन् हत्या; आरोपीचा खरा चेहरा 'असा' समोर आला

SCROLL FOR NEXT