मंदिरात भेटायला बोलावलं, अपरहण करत हॉटेलवर नेलं; तरुणीवर गँगरेप करत....

Social Media Friendship Turns Horrific: पाटणाजवळील फतुहा परिसरात तरुणीवर हॉटेलमध्ये बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. आरोपी चुन्नू कुमार आणि सुधांशू कुमार यांना पोलिसांनी अटक केली आहे.
Shocking Crime in Patna Fatuha
Shocking Crime in Patna FatuhaSaam Tv News
Published On
Summary
  • आरोपीशी सोशल मीडियावर ओळख अन् प्रेमात रूपांतर

  • हॉटेलमध्ये तरूणीवर बलात्कार

  • आरोपींना अटक

पाटणाजवळील फतुहा पोलीस स्टेशन परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. एका तरूणीसोबत दोन तरूणांनी मिळून बलात्कार केला आहे. हॉटेलमध्ये जबरदस्ती नेऊन तिच्या शरीराचे लचके तोडले. या प्रकरणानंतर पीडितेनं थेट पोलीस ठाणे गाठले. तसेच तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपास करून एक थार कार आणि ५ मोबाईल फोन जप्त केले आहेत. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडिता पाटणा शहर परिसरात तिच्या कुटुंबियांसोबत राहते. चुन्नू कुमार आणि सुधांशु कुमार असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. डीएसपी- १ अवधेश कुमार यांनी सांगितलं, चुन्नू कुमारची सहा महिन्यांपूर्वी २५ वर्षीय पीडितेसोबत सोशल मीडियावर ओळख झाली होती. मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये मतभेद सुरू होते.

Shocking Crime in Patna Fatuha
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर? नेमकं कारण काय? सुप्रीम कोर्टात काय घडलं?

मतभेद सोडवण्यासाठी सोमवारी चुन्नूने तरूणीला मंदिरालाजवळ भेटायला बोलावले होते. नंतर तिला जबरदस्तीने चारचाकीत बसवून हॉटेलमध्ये नेलं. चुन्नूचे तीन मित्रही त्याच गाडीत होते. हे सर्वजण तरूणीला हॉटेलमध्ये घेऊन गेले. जेव्हा तरूणीने हॉटेलमध्ये जाण्यास नकार दिला, तेव्हा तिला जबरदस्तीने खोलीत नेले. यानंतर चुन्नूचे मित्र हॉटेलबाहेर पहारा देण्यासाठी उभे राहिले.

Shocking Crime in Patna Fatuha
गोरेगावमध्ये परप्रांतीय भाजीविक्रेत्यांची दादागिरी, २ गटामध्ये जबर हाणामारी; एकाचा मृत्यू

चुन्नू आणि त्याचा मित्र सुधांशू कुमार या दोघांनी तिला खोलीत नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. या घटनेनंतर पीडित तरूणीनं पोलीस ठाणे गाठले. तसेच आरोपींविरोधात तक्रार दाखल केली. डीएसपी - १ अवधेश कुमार म्हणाले की, फॉरेन्सिक टीमने हॉटेलच्या खोलीला भेट दिली. तसेच तपासणीसाठी काही नमुने गोळा केले. ती खोली सध्या सील करण्यात आली आहे. पीडितेचा जबाब नोंदवण्यात आला आहे. सर्व आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com