पुणे : कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून रवींद्र धंगेकरांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. सामच्या बातमीवर यामुळे शिक्कामोर्तब झालं आहे. धंगेकर काँग्रेसचे उमेदवार असतील असा अंदाज साम टीव्ही वर्तवला होता.
पुण्यातील कसबा विधानसभा पोटनिवडणुक अतिशय रंगतदार बनत चालली आहे. महाविकासआघाडी आणि भाजपाचे उमेदवार आज साडेनऊ वाजता आमने-सामने येण्याची शक्यता आहे.
दोन्ही उमेदवार आज आपापल्या नेत्यांसह एकाच वेळी पुण्याचे ग्रामदैवत असलेल्या कसबा गणपतीचे दर्शन घेणार आहे. भाजपाने हेमंत रासणे यांना उमेदवारी दिली आहे तर काँग्रेसकडून रविंद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली आहे. (Pune News)
दोन्ही उमेदवार आज आपापल्या पक्षातील नेत्यांसह शक्तीप्रदर्शन करणार आहेत. कसबा गणपतीचं दर्शन घेतल्यानंतर दोन्ही उमेदवार कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदारी अर्ज दाखल करतील. यावेळी महाविकासआघाडी आणि भाजपकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात येणार आहे.
कसबा विधानसभा पोटनिवडणुकीचा उमेदवारी अर्ज काँग्रेस आज दाखल करणार आहे. पुण्याचे ग्रामदैवत कसबा गणपतीचे दर्शन घेऊन प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य रॅली काढून उमेदवारी अर्ज भरण्यात येणार आहे. यासाठी काँग्रेसकडून कार्यकर्त्यांना सकाळी ९.३० वाजता कसबा गणपती मंदिर येथे उपस्थित रहाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दुसरीकडे, भाजप, बाळासाहेबांची शिवसेना, आर. पी. आय. (ए), शिवसंग्राम, राष्ट्रीय समाज पक्ष आणि रयत क्रांती संघटना महायुतीचे कसबा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार हेमंत नारायण रासने हे देखील उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
त्यापूर्वी ते देखील कसबा गणपतीचे दर्शन घेणार आहे. यानंतर ते भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, शहराध्यक्ष जगदीश मुळीक, आमदार माधुरी मिसाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत उमेदवारी अर्ज सादर भरणार आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.