Pune Traffic Rules News Saam TV
मुंबई/पुणे

Pune Traffic News: वाहतुकीचे नियम मोडण्यातही पुणे मागे नाही; पुणेकरांना 10 महिन्यांत तब्बल 73 कोटींचा दंड

Pune Traffic Rules News: पुणेकरांकडून वाहतुकीच्या नियमांचं मोठ्या प्रमाणात उल्लंघन होत असल्याची माहिती समोर आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ज्ञानेश्वर हिंगोलीकर, पुणे

Pune traffic Rules News: पुणे शहरात वाहतुककोंडीची समस्या मोठी आहे. वाहतुक सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत असते. मात्र, पुणेकरांनी वाहतुकीचे नियम (Traffic Rules) मोडण्यात कसलीही कसर सोडलेली नाही. पुणेकरांकडून (Pune) वाहतुकीच्या नियमांचं मोठ्या प्रमाणात उल्लंघन होत असल्याची माहिती समोर आली आहे. परिवहन विभागाकडून वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात येत आहे.

परिवहन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ट्र्रॅफिक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गेल्या 10 महिन्यांत तब्बल 73 कोटी रुपयांहून अधिक दंड पुणेकरांवर ठोठावण्यात आला आहे. या आकडेवारीवरुन पुणेकर वाहतुकीचे नियम तोडण्यातही कुणाच्या मागे नाही हे लक्षात येते. (Pune Latest News)

विशेष म्हणजे यात विनाहेल्मेट प्रवास करणाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. वाहतुकीच्या इतर नियमांपेक्षा विनाहेल्मेट दुचाकीचा प्रवास करणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. मिळालेल्या माहितीनुसार वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या पुणेकरांवर गेल्या १० महिन्यांत तब्बल ७३ कोटी २९ लाख ६८ हजार ९०० रुपये इतका दंड परिवहन विभागाने ठोठावला आहे. या दंडापैकी केवळी २० कोटी ७ लाख ३८ हजार ७५० रुपये दंड पुणेकरांनी भरला.

उर्वरीत ५३ कोटी २२ लाख २५ हजार १५० रुपये दंड वसूल करण्याचे वाहतूक पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. यात विनाहेल्मेट दुचाकी चालवल्यामुळे दंड ठोठावल्याची संख्या सर्वात जास्त आहे, त्यामुळे त्याची एकूण रक्कम ही ३८ कोटी ५६ लाख इतकी प्रचंड आहे. तर नो पार्कींगच्या दंडाची रक्कम १० कोटी ६५ लाख इतकी आहे.

दरम्यान पुण्यातल्या वाहतुककोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. या वाहतूक कोंडीचा (Traffic Jam) फटका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनाही बसला होता. २१ ऑक्टोबरला वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अंबादास दानवेंना आपल्या मार्गात बदल करावा लागला होता. वाहतुकीला अडथळा असलेला पुण्यातील (Pune) चांदणी चौक हा पूल २ ऑक्टोबर, रविवारी मध्यरात्री १ वाजता ब्लास्ट करुन पाडण्यात आला होता. त्यामुळे आता काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मात्र, पुण्याच्या या प्रचंड मोठ्या वाहतुकीवर नियंत्रण करणाऱ्या वाहतुक पोलिसांची संख्याही कमी असल्याने ही वाहतुककोंडी होत आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs South Africa: वर्ल्ड चॅम्पियन्सचा नाद करायचा नाय! भारताचा द.आफ्रिकेवर मोठा विजय; ३-१ ने मालिका जिंकली

IND vs SA: पैसा वसूल मॅच! संजू - तिलकची शतकं; भारताने उभारला रेकॉर्ड ब्रेकिंग स्कोअर

Assembly Election: भुसा पाडायला आलोय, दादा भुसेंवर टीकास्त्र; शिंदे सेनेच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली !

Sanju Samson Six: खूप जोरात लागला..संजूच्या षटकारामुळे महिला फॅनला रडू कोसळलं - VIDEO

IND vs SA: संजू सॅमसनने खेचला 1500 वा षटकार! टीम इंडियाच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद

SCROLL FOR NEXT